चंद्रपूर : चिमूर तालुक्यातील मुरपार येथील शेतात वखरणी सुरू असताना वीज कोसळून शेतमजुराचा मृत्यू झाला.शेतमजूर रामकृष्ण नामदेव नेवारे (३७) हे नानाजी दोडके यांच्या मालकीच्या शेतात वखरणी करीत होते. बुधवारी चार वाजताच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह पाऊस सुरू झाला. दरम्यान, वीज कोसळल्याने नेवारे यांचा मृत्यू झाला. याचबरोबर, दोडके यांचा एक बैलही दगावला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lightning killed farm labour in chimur taluka zws