वर्धा : वर्धेलगत रोठा या गावी उमेद संकल्प हा प्रकल्प आहे. इथे अद्याप भीक मागणे हाच जीवन जगण्याचा मार्ग असलेल्या पारधी समाजातील मुलांचा सांभाळ होतो. संचालिका मंगेशी मून या समाजातील मुलांना अक्षरशः वेचून इथे आणतात व शाळेत घालतात. हे करतांना त्यांना समाजाकडून व आई वडिलांकडून मोठा विरोध होतो. तो दगडफेक होणारा राग स्वीकारून त्या मुलांना शिकवितातच. त्यातून मोती निपजल्याचे हे उदाहरण.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मून म्हणतात, प्रकल्पात बारा वर्षाची मुस्कान व दहा वर्षांची चंद्रमूखी शिकायला आल्या. पण आल्यापासून त्यांच्या आईने भांडूण भांडूण कित्येकदा त्यांना घेऊन गेली . मुस्कान, चंद्रमुखी ला शिकायचे होते पण त्यांचे आई वडील काम करत नव्हते म्हणून शिक्षण सोडून मुलींना भिक मागायला आणि फुगे विकायला घेऊन जायचे. फुगे फक्त महाराष्ट्रात नाही तर बेंगलोर मेंगलोर ला विकायला घेऊन जात असे.

हेही वाचा…अमरावती : धावाधाव, धक्काबुक्की, जीवाची बाजी! हंडाभर पाण्यासाठी आदिवासी महिलांचा जीव धोक्यात…

त्या मुलीच आईवडीलांना पोसत होत्या आणि आईवडील दारू व जुगार यात आलेले सगळे पैसे उडवित असे.त्या दोघीही दिवसाला तीनतीन- चारचार हजार कमवायच्या. दिवस रात्र धडपडाच्या आणि आईवडीला जवळ आल्या कि नुसते झगडे भांडण आणि मारहाण. शेवटी त्यांना फुगे विकायला जाणं भाग पाडायचे.

रोज रोज तीच कटकट आणि भांडण झगडे करून त्या वैतागाच्या आणि मग आमच्या होस्टेलला पळून यायच्या. त्या आल्या की त्यांचे आईवडील परत होस्टेलला येऊन तमाशा करायचे आणि परत घेऊन जायचे. अस करीत त्यांनी त्यांचे दहावीचे दोन वर्षे गमावले. पण त्यांच्या आईवडिलांना कुठलाही पश्चाताप झाला नाही.

शेवटी दोन वर्षे गमविल्यानंतर एक दिवस आजी सोबत पळून आल्या आणि यावर्षी आईवडिलांच्या विरोधात जाऊन दहावी करायची अस ठरविलं. त्यासाठी मुस्कानला आईवडिलांशी भांडावे लागले. तिचे आईवडील दुसऱ्याच दिवशी प्रकल्पात आले आणि चार तास त्यांचा तमाशा चालला. त्यांच्या भांडणात मला पोलिसांना बोलवावे लागले. ते सुद्धा हताश झाले. पण त्यांनी मोठ्या मुश्कीलने त्यांना समजावून पाठविले. नंतर सुद्धा ते शांत बसले नाही तर अमरावती पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार केली. मुन मॅडम आमच्या मुली देत नाही . आणि आम्हाला मुली तिथे ठेवायच्या नाहीत. आमच्या मुलींचा दाखला द्यावा, असं पोलिसांना सांगितले.

हेही वाचा…कार वॉशिंग व्यवसायिकांना यंदा संघाचे बौद्धिक, संघाची कार्यपध्दती समजावून सांगणार

पोलिसांनी त्यांच ऐकून मला फोन केला आणि मुली परत द्यायला सांगितल्या. मी म्हणाले की मी मुली परत दयायला तयार आहे. पण त्यांचे आई वडील मुलींना शिकू देत नाही आणि कुठे दाखल पण करणार नाही. पण जर त्यांची जबाबदारी तुमचे पोलीस स्टेशन घेईल तर .तसे लेखी मला लिहून द्या. मी लगेच मुली देते. तसेच कुठे शाळेत दाखल करणार त्या शाळेचे नाव व पत्ता मला द्या,असं बोलल्या नंतर पोलिसांनी सुद्धा हात झटकले आणि त्यांना पोलीस स्टेशनमधून परत पाठविले. असे मंगेशी मून यांनी सांगितले.

पण तरीही आई वडील काही शांत बसले नाही. त्यांनी त्यांच्या समाजातील जेष्ठ, सरपंच आणि इतर लोक जमा करून फोन केला आणि मला धमक्या द्यायला लागले. एवढचं नाहीतर त्यांच्यातले दोन ते तीन लोक तिच्या आईवडिलांना सोबत परत प्रकल्पात आले. त्यावेळी नेमकी मीचे तिथे नव्हती. तर ते एका मुलीला चंद्रमुखी ला जबरदस्तीने घेऊन गेले. खुप प्रयत्नानंतर पण आम्ही तिला थांबवू शकलो नाही. कारण त्यांना समजावून सांगणे म्हणजे तारेवरची कसरत होती. असे मंगेशी मून म्हणाल्या.

चंद्रमुखी गेली म्हणून मुस्कान अस्वस्थ झाली होती . तिला वाईट वाटले पण काही करता येत नव्हते. काही महिने शांतपणे गेले.दसरा , दिवाळी झाली. परीक्षा तोंडावर आली. मुस्कानला सतत वाटे माझ्या बहिणीचे परत वर्षे वाया जायला नको. ती मला सारखी फोन लावून मागायची की कोणी तरी आम्हाला समजून घेईल आणि चंद्रमुखीला परीक्षेला पाठवेल. दिवसामागून दिवस गेले. परीक्षा जवळ यायला लागली. आणि अचानक एक दिवस चंद्रमुखी प्रकल्पात आली. परीक्षेला दीड महिना बाकी होता. मुस्कान अतिशय खुश झाली. दोघींनीही ठरविले दहावी पास करायची. काहीही झालं तरी जायच नाही , मॅडम सांगतात तस करू आणि सुरू झाला त्यांचा संघर्षमय प्रवास. परीक्षा सुरू होई पर्यंत कुणालाच भेटायचं नाही की कुणाचा फोन घ्यायचा नाही. काहीही झालं तरी परीक्षा द्यायची असं ठरविले आणि पेपरचा दिवस आला. दोघींनीही हिम्मतीने पेपर दिले. आणि चांगल्या टक्क्यांनी पास पण झाल्या. त्यांचा आत्मविश्वास वाढला.

हेही वाचा…लोकजागर : निवडणूक आख्यान – चार

आम्ही काहीतरी करू शकतो हे त्यांना कळलं. पण त्यासाठी आईबाबा कडे जायचं नाही, आईबाबा कडे गेलो तर शिकू देणार नाही म्हणून त्या अजूनही प्रकल्पातच राहतात. त्यांच्या संपूर्ण शिक्षणाची आणि संगोपनाची जबाबदारी आता आपली आहे. त्यांच्या हुशारीने आणि मेहनतीने त्या स्वबळावर नक्की उभ्या होतील. यासाठी त्यांना आपल्या मदतीची गरज आहे. आता त्या पुढचे शिक्षण पुण्यात घेणार आहे. त्यांना मदत द्या,आपली मदत या मुलींना उज्वल भविष्य देईल, असे मंगेशी मून म्हणतात. हा प्रकल्प श्रीमती मून यांच्या शेतीतील उत्पन्नावर कसाबसा चालतो. तसेच त्या स्वतः देणगी मिळविण्याचा प्रयत्न करीत असतात. या सेवेत सर्वांनी हातभार लावावा असे आवाहन मून ( +९१७४९९४ १६४१३) यांनी केले आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Umed sankalp project rescues two sisters forced to beg helps them pass ssc exams with good grades in wardha pmd 64 psg