उमेश कोल्हे हत्या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी व्हावी- डॉ. अनिल बोंडे

येथील अमित मेडिकल्सचे संचालक उमेश कोल्हे यांच्या हत्या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करावी आणि या प्रकरणातील सूत्रधाराला अटक करावी, अशी मागणी खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी केली आहे.

umesh kolhe
उमेश कोल्हे


अमरावती : येथील अमित मेडिकल्सचे संचालक उमेश कोल्हे यांच्या हत्या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करावी आणि या प्रकरणातील सूत्रधाराला अटक करावी, अशी मागणी खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी केली आहे. कोल्हे यांनी नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ काही संदेश समाज माध्यमांवर प्रसारीत केल्या होत्या. त्यामुळे ही घटना उदयपूरप्रमाणे असल्याचा आरोप बोंडे यांनी केला आहे.

डॉ. अनिल बोंडे यांनी पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह यांची भेट घेऊन या प्रकरणाचे तथ्य जनतेसमोर आले पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
उमेश कोल्हे यांना फोनवरून अज्ञात व्यक्तींनी धमकी दिल्याची माहिती आहे. ज्या पद्धतीने उदयपूर येथे एका व्यक्तीची हत्या करण्यात आली, त्याच पद्धतीने अमरावतीत हत्या झाल्याचा संशय आहे. अजूनही या प्रकरणातील सूत्रधाराला ताब्यात घेतले गेलेले नाही, त्याला तत्काळ अटक करावी, अशी मागणी डॉ. बोंडे यांनी केली आहे.

मराठीतील सर्व नागपूर/विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Umesh kolhe murder case should be investigated at a high level dr anil bonde amy

Next Story
नागपूर : मेडिकलचे कुलर्सच डास उत्पत्ती केंद्र !
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी