yashomati thakur on chitra wagh and journalists argument in press conference | Loksatta

‘चित्रा नव्हे, त्या तर ‘विचित्र ताई’! यशोमती ठाकूर यांची शेलकी टीका

एका पत्रकार परिषदेत संजय राठोड यांच्याबद्दल विचारलेल्या प्रश्नावरु चित्रा वाघ आणि एका पत्रकारामध्ये खडाजंगी झाली होती. याच प्रकरणावरुन ठाकूर यांनी निशाणा साधला

‘चित्रा नव्हे, त्या तर ‘विचित्र ताई’! यशोमती ठाकूर यांची शेलकी टीका
यशोमती ठाकूर यांची चित्रा वाघ यांच्यावर टीका

चित्राताईंबद्दल काय बोलायला लावता? सर्वांना माहिती आहे चित्राताई नाही तर विचित्र ताई आहेत, अशा शेलक्या शब्दात काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर यांनी चित्रा वाघ यांच्यावर टीका केली. ठाकूर या सध्या भारत जोडो पदयात्रेच्या नियोजनासाठी शेगाव येथे आल्या होत्या त्यावेळेस प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी चित्रा वाघ यांच्यावर जोरदार निशाणा साधला.

हेही वाचा- चित्रा वाघ यांच्या शनिवारी होणाऱ्या पत्रकार परिषदेवर पत्रकारांचा बहिष्कार

नेमक काय घडलं होतं?

एका आयोजित पत्रकार परिषदेत राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारमधील मंत्री संजय राठोड यांच्यावर पूजा चव्हाण प्रकरणात आरोप करून आपण त्यांचे राजकीय जीवन उध्वस्त केले नाही काय, असा प्रश्न विचारताच भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ भडकल्या. प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारास पत्रपरिषदेत का बोलावले?, यापुढे अशा पत्रकारांना आपल्या पत्रकार परिषदेत आमंत्रित करायचे नाही, असा दम स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांना दिला. यावेळी चित्रा वाघ आणि पत्रकारांमध्ये चांगलीच खडाजंगी झाली होती.

हेही वाचा- वर्धा: पत्रकारांचा बहिष्कार, तरीही चित्रा वाघ आपल्या भूमिकेवर ठाम

सोबतच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार जितेंद्र गव्हाड यांच्या अटकेबद्धल विचारले असता, त्या म्हणाल्या, राज्यात हुकूमशाही सुरू आहे की काय असे वाटत आहे. आमच्या जिल्ह्यातही एक खासदार आहे ज्यांना न्यायालयाने वॉरंट बजावला आहे. मात्र तरीही त्यांना वाचवायचा प्रयत्न होत आहे. संघ आणि भाजपवाले नेहमीच इतिहासाची मोडतोड करतात. एक लोकप्रतिनिधी, एखाद्या माजी मंत्र्याला एखाद्या गोष्टीला विरोध करावासा वाटतो तर त्याला अटक केली जाते? हे सारे विचित्रच असल्याचे आमदार ठाकूर यांनी यावेळी सांगितले.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 12-11-2022 at 17:30 IST
Next Story
नागपूर: कठडे तोडून गाठले गडकरींचे कार्यालय!; विदर्भवाद्यांचा आक्रमक पवित्रा