नाशिक : नाशिक आणि धुळे जिल्ह्यात सीएनजीच्या (कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस) किमतीत तीन रुपये ४० पैशांनी कपात करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड (एमएनजीएल) कंपनीने दिली आहे. बुधवारपासून हे दर लागू झाले असून आता सीएनजीसाठी प्रतिकिलोला वाहनधारकांना ९२ रुपये ५० पैसे मोजावे लागणार आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

इंधनाच्या किमती गगनाला भिडल्याने वाहनधारकांनी सीएनजी वाहनांचा पर्याय निवडला. परंतु मागील काही महिन्यांत सीएनजीच्या किमती इतक्या वाढल्या की त्या पेट्रोल आणि डिझेलच्या पातळीवर गेल्याची वाहनधारकांची भावना आहे. सीएनजीची दरवाढ वाहनधारकांचे आर्थिक समीकरण विस्कळीत करणारी ठरत आहे. दुसरीकडे शहरात सीएनजीची वाहने वाढत असताना पुरेशा प्रमाणात गॅसची उपलब्धता होत नाही. सीएनजी घेण्यासाठी भल्या सकाळपासून पंपावर वाहनांच्या रांगा लागतात. गॅस संपुष्टात आल्यावर रांगेतील वाहनधारकांना माघारी फिरावे लागते. सीएनजी वाहनांच्या संख्येत पंप तुलनेत कमी आहे. वाढत्या किमती व सीएनजी मिळवतानाची दमछाक यामुळे वाहनधारक त्रस्तावले आहे. या स्थितीत सीएनजीचे दर प्रतिकिलोला तीन रुपये ४० पैशांनी कमी झाल्यामुळे वाहनधारकांना काहीसा दिलासा मिळणार आहे.  

एमएनजीएल कंपनीने दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी मध्यरात्रीपासून ही दरकपात लागू झाली. सीएनजीची किंमत प्रतिकिलो ग्रॅमला तीन रुपये ४० पैशांनी कमी झाल्याचे कंपनीने म्हटले आहे. सीएनजीची ९५ रुपये ९० पैसे प्रतिकिलो असणारी किंमत आता ९२ रुपये ५० पैसे प्रतिकिलो इतकी कमी झाली आहे. या दरकपातीमुळे सीएनजी दर पेट्रोल आणि डिझेलच्या तुलनेत प्रवासी चारचाकी वाहनांसाठी अनुक्रमे सुमारे ४७ टक्के आणि २४ टक्क्यांची बचत देतील आणि ऑटो रिक्षांसाठी  स्पर्धात्मकता व उत्तम मायलेज यामुळे सुमारे २४ इतकी बचत होईल, असा दावा कंपनी करीत आहे. घरगुती नैसर्गिक वायूच्या खरेदी किमतीत घट झाल्याने सीएनजीच्या दरात ही कपात करण्यात आली.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cng price reduced over rs 3 in nashik and dhule district zws