नाशिक : इगतपुरी तालुक्यातील सांजेगाव आणि मुरंबी येथील तलाठ्यास सचिन काशिनाथ म्हस्के, वय ३८ याला २० हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधकच्या पथकाने रंगेहात ताब्यात घेतले. तक्रारदार आणि त्यांचे इतर तीन भागीदार यांनी मिळून इगतपुरी तालुक्यात मुरंबी गाव येथे जमीन खरेदी केली आहे. सदर जमिनीच्या गाव नमुना सातबारा महसूल अभिलेखावर् नोंद करून देण्याच्या मोबदल्यात तलाठी सचिन म्हस्के (३८) यांनी २० हजार रुपये लाच मागणी करून शनिवारी पंच साक्षीदार यांचे समक्ष २० हजार रुपये स्वीकारले. त्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 02-07-2023 at 12:02 IST
Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Talathi arrested while accepting bribe nashik igatpuri ysh