-
आंतरराष्ट्रीय ख्यातीचा गायक एड शीरन भारतात आला असून मुंबईतील जिओ गार्डनमध्ये रविवारी त्याचा लाईव्ह कॉन्सर्ट पार पडला. 'शेप ऑफ यू' फेम एड शीरनच्या या कॉन्सर्टसाठी मोठ्या प्रमाणात चाहत्यांची गर्दी होती. मात्र, त्यापूर्वी त्याने काही बॉलिवूड कलाकारांसोबत वेळ घालवला. कोरिओग्राफर फराह खानने त्याच्यासाठी एका खास पार्टीचं आयोजन केलं होतं.
-
या पार्टीला फराहचा जिवलग मित्र आणि बॉलिवूडचा किंग खान अर्थात शाहरुख खानसुद्धा हजर होता.
'पद्मावती' स्टार शाहिद कपूर त्याची पत्नी मीरा राजपूतसह पार्टीला उपस्थित होता. -
अभिनेत्री मलायका अरोराने पार्टीत एड शीरनसोबत डान्सही केला.
टेलिव्हिजन अभिनेत्री आणि लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी मौनी रॉयसुद्धा या पार्टीला उपस्थित होती. या पार्टीमध्ये अभिनेत्री कतरिना कैफचा बोल्ड अंदाज पाहायला मिळाला. ग्रॅमी पुरस्कार विजेता गायक एड शीरन ‘शेप ऑफ यू’ या गाण्यामुळे चर्चेत आला. त्याच्या या गाण्याने बॉलिवूड सेलिब्रिटींनाही वेड लावल्याचे पाहायला मिळाले. आजच्या घडीला त्याचे हे गाणे अनेकांच्या प्ले लिस्टचाही भाग झाले असून, सोशल मीडिया आणि तरुणाईमध्येही एडच्या या गाण्याची प्रचंड क्रेझ पाहायला मिळते.
एड शीरनसोबत बॉलिवूड कलाकारांचा ‘शेप ऑफ यू’
Web Title: Shape of you fame ed sheeran chilled with shah rukh khan katrina kaif at a special bash hosted by farah khan