-
‘टॅलेंट हंट शो’मध्ये भाग घेण्यापासून ते शोची निवेदिका होईपर्यंत अभिनेत्री प्राजक्ता माळीने फार मेहनत घेतली आहे. केवळ टीव्हीवरच नाही तर चित्रपटांद्वारेही तिने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. (सर्व फोटो सौजन्य – प्राजक्ता माळी / इंस्टाग्राम)
-
‘जुळून येती रेशीमगाठी’, ‘नकटीच्या लग्नाला यायचं हं’ यांसारख्या प्रसिद्ध मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या प्राजक्ताने अभिनयाच्या जोरावर प्रत्येक प्रेक्षकांच्या मनात एक स्वतंत्र स्थान निर्माण केलं. उत्तम अभिनयशैली आणि गोजिरवाणा चेहरा यांच्या जोरावर प्राजक्ता आज विशेष लोकप्रिय आहे.
-
मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी सध्या सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय असते. प्राजक्ताने नुकतेच आपले काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. अभिनयाची आवड असणाऱ्या प्राजक्ताला फोटो काढण्याचीही तितकीच आवड आहे.
-
प्राजक्ताने सोनेरी रंगाचा ड्रेस परिधान केला असल्याचे दिसत आहे. तिच्या या मोहक अदांवर तिचे चाहते चांगलेच घायाळ झाले आहेत.
-
प्राजक्ताच्या या नवीन फोटोशूटवर आणि तिच्या गोड हसण्यावर तिचे चाहते चांगलेच फिदा झाले आहेत. सध्या सोशल मीडियावर प्राजक्ताच्या या फोटोंची चर्चा सुरु आहे.
प्राजक्ता माळीचा ग्लॅमरस अंदाज, चाहते फिदा…
Web Title: Actress prajakta mali latest photoshoot hot and glamorous look sdn