-

स्टार प्रवाहवरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या लोकप्रिय मालिकेतून घराघरांत पोहोचलेली लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे माधवी निमकर.
-
आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी माधवी सोशल मीडियावरही तितकीच सक्रिय असते. सोशल मीडियावर ती आपले अनेक फोटो-व्हिडीओ शेअर करताना दिसते.
-
अशातच काही दिवसांपूर्वी माधवीनं आपल्या चाहत्यांबरोबर एक खुशखबर शेअर केली. ही खुशखबर म्हणजे तिनं मुंबईत दुसरं नवीन घर घेतल्याची.
-
माधवीनं मुंबईच्या मालाड परिसरात स्वतःच हक्काचं नवीन घर घेतलं आहे. या घराचे काही फोटो माधवीनं आपल्या सोशल मीडियाद्वारे शेअर केले आहेत.
-
माधवीनं घेतलेल्या या नवीन घराचं काम अजून पूर्ण झालेलं नाही, त्यामुळे घराचे फोटो शेअर करीत तिनं ‘Work In Progress’ असं आणि ‘2nd Home’ असं कॅप्शन दिलं आहे. तसंच कॅप्शनमधून तिनं आई-वडिलांचे आभार मानले आहेत.
-
माधवीच्या या नवीन घराबद्दल सोशल मीडियादारे तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होतो आहे. अभिनेत्रीच्या अनेक चाहत्यांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत. तसंच माधवीच्या सहकलाकारांनीसुद्धा नवीन घरानिमित्त माधवीचं कौतुक केलं आहे.
-
गेल्या काही दिवसांत अनेक मराठी कलाकारांनी त्यांच्या नव्या घराची स्वप्नपूर्ती केल्याचं पाहायला मिळालं. मराठी मनोरंजन विश्वातल्या अनेक कलाकार मंडळींनी मुंबई या मायानगरीत हक्काचं घर खरेदी केलं.
-
भाग्यश्री मोटे, अनुजा साठे, मीरा जोशी, सिया पाटील यांनी मुंबईत स्वतचं नवीन घर घेतलं. अशातच आता यात आणखी एका अभिनेत्री माधवी निमकरचाही समावेश झाला आहे. (सर्व फोटो सौजन्य : माधवी निमकर इन्स्टाग्राम)
-
दरम्यान, ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेनंतर माधवी कोणत्या नव्या प्रोजेक्टमधून अद्याप प्रेक्षकांच्या भेटीस आली नाही. त्यामुळे आता अनेकजण तिच्या नव्या प्रोजेक्टची वाट पाहत आहेत.
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीनं मुंबईत घेतलंय दुसरं घर; सोशल मीडियावर खास फोटो शेअर करीत दिली गुडन्यूज
मराठी अभिनेत्रीनं मुंबईत ‘या’ लोकेशनवर घेतलंय हक्काचं दुसरं घर; खास फोटो शेअर करीत म्हणाली…
Web Title: Marathi actress madhavi nimkar buys second new home in mumbai shares photos ssm 00