-

मराठी अभिनेत्री अश्विनी महांगडे हिने नुकताच एक सुंदर फोटो शेअर करत स्वतःसाठी शांततेचा क्षण घेतल्याचं दाखवलं आहे.
-
तलावाच्या काठावर उभ्या असलेल्या अश्विनीचा हा फोटो निसर्गाच्या सान्निध्यातील तिचं साधं आणि समाधान देणारं रूप दर्शवतो.
-
या फोटोत ती पांढऱ्या रंगाच्या हलक्या प्रिंटेड कपड्यांमध्ये दिसते, ज्यामुळे तिचा लूक अधिक शांत आणि सोज्वळ वाटतो.
-
डोंगर, पाणी आणि सूर्यास्ताच्या पार्श्वभूमीवर तिचा लूक अधिकच मनमोहक दिसत आहे.
-
तिच्या चेहऱ्यावर कोणताही मेकअप न करता, नैसर्गिक भाव झळकत आहेत, जे फोटोलाच एक वेगळी झळाळी देतात.
-
अश्विनीने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे “Not every day has to Shine, some days are for breathing,” ज्यातून तिचा शांततेकडे झुकलेला विचार दिसतो.
-
तिने घातलेला प्रिंटेड व्हाईट आउटफिट आणि हलक्या रंगाच्या शूजमुळे तिचा स्टाईल स्टेटमेंट वेगळाच दिसतो.
-
संध्याकाळच्या सौम्य प्रकाशात, पाण्याच्या लहरींच्या आवाजात अश्विनीचा हा फोटो म्हणजे शांततेचा एक सुंदर अनुभव आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : अश्विनी महांगडे/इन्स्टाग्राम)
Photos: सूर्यास्ताच्या साक्षीने निसर्गाच्या सान्निध्यात खुलला अश्विनी महांगडेचा सोज्वळ लूक
तलावाच्या काठी संध्याकाळच्या प्रकाशात टिपलेला अभिनेत्रीचा हा क्षण निसर्गप्रेम आणि मनःशांतीचा सुंदर संगम दाखवतो.
Web Title: Marathi actress ashwini mahangade peaceful evening sunset photoshoot viral svk 05