-

नेहा पेंडसे सध्या युरोपमधील नयनरम्य देश स्वित्झर्लंडमध्ये पती शार्दुल ब्याससोबत खास सुट्टी व्यतीत करीत आहे.
-
इंटरलेकन येथील बर्फाच्छादित डोंगर आणि थंडीच्या वातावरणात या जोडप्याने अनेक अविस्मरणीय क्षण कॅमेऱ्यात कैद केले आहेत. त्यांच्या फोटोंमध्ये स्वित्झर्लंडच्या निसर्गाची भव्यता स्पष्टपणे दिसून येते.
-
अभिनेत्रीने शेअर केलेल्या एका फोटोत ती पती शार्दुल ब्याससोबत आहे. या फोटोत दोघेही जॅकेट, मफलर आणि गॉगल्सद्वारे थंडीपासून स्वतःचा बचाव करताना दिसत आहेत.
-
या फोटोमध्ये नेहा पेंडसे आणि शार्दुल ब्यास दोघेही एका उंचीवरील ठिकाणी उभे आहेत.
-
फोटोमध्ये नेहा पेंडसे एकटीच बर्फावर उभी आहे. तिने तपकिरी रंगाचा लांब स्कर्ट आणि काळ्या रंगाचे जॅकेट परिधान केले आहे.
-
डोक्यावर स्कार्फ बांधून, ती या थंडीचा मनमुराद आनंद घेताना दिसत आहे.
-
अभिनेत्रीने हे फोटो शेअर करताना खालील कॅप्शन लिहिली आहे, “Life with all its glory, coming to a full circle at piz Gloria #gratitude #blessed”.
-
मराठी चित्रपटसृष्टीतील ही लोकप्रिय अभिनेत्री सध्या आपल्या कामातून वेळ काढून पतीसोबत सुटीचा पुरेपूर आनंद लुटत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : नेहा पेंडसे/इन्स्टाग्राम)
Photos : नेहा पेंडसे नवऱ्यासोबत ‘या’ बर्फाळ प्रदेशात फिरतीवर; तिचा सुंदर लूक चर्चेत
बर्फाच्या साम्राज्यात नेहा पेंडसे-शार्दुल ब्यास; इंटरलेकन, स्वित्झर्लंडमध्ये अविस्मरणीय ‘Piz Gloria’ भेट
Web Title: Marathi actress neha pendse husband snowy trip winter look travel photos svk 05