-
पेल्विक भागात वेदना
सतत फुगणे किंवा पेल्विक वेदना हे अंडाशयाच्या (ओव्हरीयन) कर्करोगाचे प्रारंभिक लक्षण असू शकते. (फोटो सौजन्य : अनस्प्लॅश) -
मूत्रमार्गात रक्त
मलात किंवा लघवीत रक्त दिसल्यास, ते आतड्याच्या किंवा मूत्राशयाच्या कर्करोगाची लक्षणे असू शकतात. त्यामुळे अशा परिस्थितीत तत्काळ तपासणी करून घेणे आवश्यक आहे . (फोटो सौजन्य : अनस्प्लॅश) -
स्तनात असामान्य बदल
स्तनात गाठ, त्वचेत बदल (उदाहरणार्थ dimpling), निपलचा डिस्चार्ज किंवा स्तनाच्या आकारात बदल हे सर्व स्तनाच्या कर्करोगाचे गंभीर संकेत असू शकतात . (फोटो सौजन्य : अनस्प्लॅश) -
तीन आठवड्यांपेक्षा जास्त टिकणारा खोकला
हे लक्षण फुप्फुस किंवा घशाच्या कर्करोगाची शक्यता दर्शवू शकतात . (फोटो सौजन्य : अनस्प्लॅश) -
थकवा
विश्रांतीनंतरही कायम असणारा तीव्र थकवा हे काही कर्करोगाचे आरंभीचे लक्षण असू शकते. (फोटो सौजन्य : अनस्प्लॅश) -
मॉलक (मोल्स)मध्ये बदल:
नवीन मोल, आकार किंवा रंग बदलणे, किंवा ही त्वचेच्या कर्करोगाची लक्षणे असू शकतात. (फोटो सौजन्य : अनस्प्लॅश) -
असामान्य रक्तस्राव
संभोगानंतर किंवा मेनोपॉजनंतर झालेला रक्तस्राव हा गर्भाशयाशयी (युटेरिन) किंवा गर्भाशय ग्रीवा (सर्व्हिकल) कर्करोगाचे लक्षण असू शकते. (फोटो सौजन्य : अनस्प्लॅश) -
अनपेक्षित वजन घटणे
आहार किंवा व्यायामामध्ये कोणताही बदल केलेला नसतानाही वजन अचानक कमी होणे हे लक्षण विशेषतः पॅन्क्रिॲटिक कर्करोगासह अनेक प्रकारच्या कर्करोगाशी संबंधित असू शकते (फोटो सौजन्य : अनस्प्लॅश). -
स्त्रियांनी वर नमूद केलेल्या लक्षणांपैकी कोणताही बदल लक्षात आल्यास जरी तो साधारण वाटत असला तरी लवकरात लवकर डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यंत आवश्यक आहे. लवकर निदान केल्यास कॅन्सरच्या उपचाराची शक्यता आणि यशस्वीता वाढते. (फोटो सौजन्य : अनस्प्लॅश)
महिलांमध्ये कॅन्सरची सुरुवातीला दिसतात ‘ही’ लक्षणे; दुर्लक्ष न करता, लगेच व्हा सावध
सततचा थकवा, असामान्य रक्तस्राव, स्तनात बदल, पोट फुगणे यांसारख्या संकेतांकडे दुर्लक्ष करू नये. लवकर निदानाने उपचार सोपे होतात.
Web Title: Women cancer early warning signs and symptoms alert health tips svk 05