-

केसांमधील कोंडा ही एक त्रासदायक समस्या आहे. कोरडेपणा, बुरशीची वाढ किंवा तेलाच्या अतिवापरामुळे ही समस्या निर्माण होते. आम्ही तुम्हाला सहा नैसर्गिक पदार्थांची माहिती देणार आहोत जे तुम्हाला केसांमधील कोंड्यापासून मुक्त होण्यास आणि टाळूचं आरोग्य सुधारण्यास मदत करू शकतात. (PC : unsplash)
-
दही : प्रोबायोटिक्स आणि लॅक्टिक अॅसिडने समृद्ध असलेले दही बॅक्टेरिया संतुलित करण्यास आणि कोंडा निर्माण करणारी बुरशी कमी करण्यास मदत करते. हेअर मास्क म्हणून दही लावणे किंवा नियमितपणे खाणे दोन्हीही मदत करू शकतं.(PC : unsplash)
-
लिंबू : लिंबामधील नैसर्गिक आम्लता टाळूचं पीएच संतुलित करण्यास, अतिरिक्त तेल, कोंडा व धूळ काढून टाकण्यास मदत करतं, ज्यामुळे केस स्वच्छ होतात. (PC : unsplash)
-
जवस : ओमेगा ३ फॅटी अॅसिडने भरलेल्या जवसाच्या बिया कोरडेपणा कमी करतात, ज्यामुळे केस निरोगी होतात. (PC : unsplash)
-
लसूण : मजबूत अँटीफंगल आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्मांसाठी ओळखला जाणारा लसूण आहारात समाविष्ट केल्यास किंवा तेल म्हणून वापरल्यास कोंडा निर्माण करणारे सूक्ष्मजंतू नष्ट करण्यास मदत होऊ शकते. (PC : unsplash)
-
नारळ: नारलाचं सेवन केलं किंवा तेल म्हणून वापर केला तरी फायदा होतो. नारळाचे अँटीफंगल आणि मॉइश्चरायझिंग गुणधर्म टाळूला शांत करण्यास आणि कोंडा होण्यास कारणीभूत ठरणारा कोरडेपणा टाळण्यास मदत करतात. (PC : unsplash)
-
आवळा: आवळा हा व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध आहे. आवळ्याचा रस कोंडा दूर करण्यास मदत करतो. (PC : unsplash)
पैसे खर्च न करता ‘या’ ६ घरगुती उपायांनी मिळवा केसांमधील कोंड्यापासून सुटका
आम्ही तुम्हाला सहा नैसर्गिक पदार्थांची माहिती देणार आहोत जे तुम्हाला केसांमधील कोंड्यापासून मुक्त होण्यास आणि टाळूचं आरोग्य सुधारण्यास मदत करू शकतात.
Web Title: Get rid of dandruff naturally with these home remedies asc