• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • वाशिम
    • बुलढाणा
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
    • इन्फ्रास्ट्रक्चर
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • कायदा
    • राजकारण
    • इतिहास
    • पर्यावरण
    • अर्थकारण
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • करिअर
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • आजचे भविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • ट्रेंडिंग
    • रेसिपी
    • लाइफस्टाइल
    • ऑटो
    • तंत्रज्ञान
    • FYI
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • चतुरा
  • फोटो
    • वेब स्टोरीज
    • व्हिडिओ
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • क्विझ – दीपिका पादुकोण
  • राज ठाकरे
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. iih a young activist who called for indefinite hunger strike in nepal got success as government accept his demands scsg

“करोना संकटाऐवजी पंतप्रधान खुर्ची वाचवण्यासाठी धडपडत आहेत,” म्हणणाऱ्या २९ वर्षीय तरुणासमोर नेपाळ सरकार झुकलं

या तरुणाच्या मागे नेपाळमधील तरुणवर्ग उभं राहिल्याचं चित्र दिसलं

September 15, 2020 11:01 IST
Follow Us
  • करोनासंदर्भातील उपाययोजना आणि एकंदर परिस्थितीसंदर्भात नेपाळ सरकारने अधिक गांभीर्याने निर्णय घेणे आणि पावले उचलने गरजेचे असल्याचे सांगत आंदोलन करणाऱ्या ई (Iih) या तरुण समाजसेवकापुढे नेपाळ सरकारला नमतं घ्यावं लागलं आहे. ई ने केलल्या प्रयत्नांची देशातील के. पी. शर्मा ओली सरकारने दखल घेत त्याच्या मागण्या मान्य केल्या आहेत. (फोटो सौजन्य : AP)
    1/

    करोनासंदर्भातील उपाययोजना आणि एकंदर परिस्थितीसंदर्भात नेपाळ सरकारने अधिक गांभीर्याने निर्णय घेणे आणि पावले उचलने गरजेचे असल्याचे सांगत आंदोलन करणाऱ्या ई (Iih) या तरुण समाजसेवकापुढे नेपाळ सरकारला नमतं घ्यावं लागलं आहे. ई ने केलल्या प्रयत्नांची देशातील के. पी. शर्मा ओली सरकारने दखल घेत त्याच्या मागण्या मान्य केल्या आहेत. (फोटो सौजन्य : AP)

  • 2/

    नेपाळमधील करोनासंदर्भातील परिस्थिती हाताबाहेर जात असतानाच दुसरीकडे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली मात्र स्वत:ची खुर्ची वाचवण्यासाठी धडपड करत असल्याचा आरोप ई ने केला होता. सरकारविरोधात आंदोलनाच्या नेतृत्व करण्याचा निर्णय घेत ई ने पहिल्यांदा १२ दिवस उपोषण करत आपल्या मागण्या रेटण्याचा प्रयत्न केला. तो येथील पटणा दरबार स्वेअरमध्ये पहिल्यांदा उपोषणाला बसला होता. (फोटो सौजन्य : AP)

  • 3/

    त्यानंतर दुसऱ्यांदा ईने २३ दिवस उपोषण करत सरकारला जागं करण्यासाठी आणि करोनासंदर्भात उपययोजना करण्याची मागणी केली. (फोटो सौजन्य : AP)

  • 4/

    अनेक आंदोलकांनी देशातील करोनासंदर्भातील धोरणांवर सरकारने काम करावं अशी मागणी करत पंतप्रधान ओली यांच्या घराबाहेरच आंदोलन केलं. (फोटो सौजन्य : AP)

  • 5/

    २९ वर्षीय ई हा स्कूल ड्रॉप आऊट म्हणजे शिक्षण अर्ध्यातून सोडून दिलेला तरुण आहे. त्याने सोशल नेटवर्किंगवर केलेल्या पोस्टवरुन या आंदोलनाचा जन्म झाला आणि त्याला देशभरातील तरुणांनी पाठिंबा दिला. (फोटो सौजन्य : AP)

  • 6/

    ई ने सुरु केलल्या आंदोलनामध्ये नेपाळमधील वेगवगेळ्या भागातील तरुणांनी सहभाग नोंदवला आणि रस्त्यावर उतरुन आंदोलने केली. अखेर तरुणांच्या या मागण्यापुढे नेपाळ सरकारला झुकावं लागलं आणि त्यांनी ई ने उपोषण सोडावे या मागणीवर त्याच्या अटी मान्य केल्या. या आंदोनलानंतर आता नेपाळ सरकारने करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक उपाययोजनांनी अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे.  (फोटो सौजन्य : AP)

  • 7/

    अनेक ठिकाणी तरुणांनी अशाप्रकारे फुटपाथवर झोपून आंदोलन केलं. मात्र या आंदोलनादरम्यान त्यांनी मास्कचा वापर केल्याचे पाहायला मिळालं. (फोटो सौजन्य : AP)

  • 8/

    ई ने सुरु केलेल्या या मोहिमेला ३ कोटींपेक्षा कमी लोकसंख्या असणाऱ्या नेपाळमध्ये तुफान प्रितिसाद मिळाला. (फोटो सौजन्य : AP)

  • 9/

    ई च्या समर्थनार्थ म्हणजेच देशातील करोनासंदर्भातील उपाययोजनांबद्दल सरकारने अधिक काळजी घेण्याची मागणी करत रस्त्यावर उतरलेल्या तरुणांवर पोलिसांनी लाठीचार्जही केला. (फोटो सौजन्य : AP)

  • 10/

    पोलिसांनी तरुण आंदोलकांवर लाठीचार्ज करण्याबरोबरच पाण्याचा मारा केला, अनेकांना अटक केली. मात्र ई ने आंदोलन मागे घेतलं नाही. (फोटो सौजन्य : AP)

  • 11/

    करोनासंदर्भातील आंदोलनाला समर्थन करणाऱ्यांमध्ये २९ वर्षीय चित्रपट निर्माता रॉबिक उपाध्यायचाही समावेश होता. त्याने सोशल नेटवर्किंगवर इनफ इज इनफ म्हणजे बास आता पुरे झाले नावाचे आंदोलन सुरु करत ई ला पाठिंबा दिला. (फोटो सौजन्य : AP)

  • 12/

    या आंदोलनाची ठिणगी ज्या पोस्टमधून पडली त्या ई ने लिहिलेल्या पोस्टमध्ये करोनासंदर्भातील सरकारी उपाययोजनांवर आपण प्रश्न विचारले पाहिजेत. आंदोलन केलं पाहिजे असं म्हटलं होतं. (फोटो सौजन्य : AP)

  • 13/

    ई च्या या पोस्टला पाठिंबा देत ४०० आंदोलनकर्ते गोळा झाले होते. यानंतर पोलिसांनी ई ला ताब्यात घेतलं. यापूर्वी ई ने अल्पसंख्यांकांसाठीही आंदोलन केलं आहे. (फोटो सौजन्य : Reuters)

  • 14/

    खेर ई च्या आंदोलनासमोर ओली सरकारने चर्चेच्या माध्यमातून उत्तर शोधण्याचा निर्णय घेत त्याच्याबरोबर एक करार केला. (फोटो सौजन्य : AP)

  • 15/

    नेपाळ सरकारने ई बरोबर केलेल्या या करारामध्ये करोनासंदर्भातील देशातील चाचण्या अधिक सक्षम केल्या जातील असं सरकारने सांगितलं. त्यानंतर ई ने आपलं उपोषण मागे घेतलं. (फोटो सौजन्य : AP)

Web Title: Iih a young activist who called for indefinite hunger strike in nepal got success as government accept his demands scsg

IndianExpress
  • ‘Virtually ran the college’: TMC student wing member accused in rape case had free run of institute even after graduating
  • As competing Jagannath temple emerges in Digha, Odisha pulls out all stops for Rath Yatra in Puri
  • Ex-ADM recalls Emergency: The night Delhi fell silent, fearing ‘something far-reaching’
  • Air India 171 crash: Last DNA match day after family holds symbolic funeral
  • Indus Waters Treaty: India rejects ‘illegal’ arbitration court’s authority, calls it ‘charade’ at Pak behest
Follow Us
  • Facebook
  • Twitter
Download Apps
  • Play_stor
  • Apple_stor
Express Group
  • The Indian Express
  • The Financial Express
  • Jansatta
  • IeTamil.Com
  • IeMalayalam.Com
  • IeBangla.Com
  • ieGujarati.com
  • inUth
  • IE Education
  • The ExpressGroup
  • Ramnath Goenka Awards
Quick Links
  • Privacy Policy
  • Terms and Conditions
  • Indian Express Group
  • Advertise With Us
  • Contact us
  • This Website Follows The DNPA’s Code Of Conduct
  • About Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.