-
टेलिग्रामचे संस्थापक आणि सीईओ पावेल दुरोव हे दुबईतील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. रशियन गुप्तचर यंत्रणेच्या तावडीतून सुटून सोशल नेटवर्किंगमध्ये घडवलेल्या क्रांतीसाठी ओळखले जाणारे दुरोव यांनी अलीकडेच लेक्स फ्रिडमन यांना मुलाखत दिली आहे. यात त्यांनी काफ्कापासून ते कृत्रिम बुद्धिमत्तेपर्यंत सर्व गोष्टींबद्दल चर्चा केली.
-
अनेक अहवालांमधून असे समोर आले आहे की, पावेल दुरोव यांनी १२ देशांमधील फर्टिलिटी क्लिनिकमध्ये अज्ञातपणे शुक्राणू दान केले आहेत. सुरुवातीला एका मित्राच्या विनंतीवरून त्यांनी हे केले असले, तरी आता हे त्यांचे एक प्रकारचे समाजोपयोगी कार्य बनले आहे.
-
फोर्ब्सच्या एका अहवालात असे दिसून आले आहे की, दुरोव आणि मॉस्कोमधील अल्ट्रा व्हिटा फर्टिलिटी क्लिनिकने त्याच्या जेनिटीक मटेरियलचा वापर करून सार्वजनिकरित्या मोफत आयव्हीएफची ऑफर दिली होती.
-
अधिक कुटुंबांना मदत करण्यासाठी आणि शुक्राणू दानाचे कलंक दूर करण्यासाठी वैद्यकीयदृष्ट्या पात्र महिलांना ही सेवा देण्यात आली होती.
-
या मुलाखतीत फ्रिडमन म्हणाले की, तुम्हाला किती मुले आहेत याबद्दल कायम गोंधळ असतो. स्पष्टपणे उत्तर देताना, दुरोव म्हणाले, “मला खरोखर माहित नाही की मला किती जैविक मुले आहेत.”
-
१९८४ मध्ये सेंट पीटर्सबर्ग येथे जन्मलेल्या पावेल दुरोव यांना “रशियाचा मार्क झुकरबर्ग” म्हणून ओळखले जाते. दुरोव यांनी प्रथम रशियातील सर्वात मोठे सोशल नेटवर्क व्हीकॉन्टाक्टे याची स्थापना करून नाव कमावले. परंतु अधिकाऱ्यांशी झालेल्या संघर्षानंतर त्यांनी २०१४ मध्ये आपला हिस्सा विकला आणि देश सोडला. त्याच वर्षी त्यांनी टेलिग्रामकडे लक्ष केंद्रित केले, जे आता जगभरात १ अब्जाहून अधिक मासिक युजर्ससह जागतिक व्यासपीठ बनले आहे.
-
रशियाच्या गुप्तचर यंत्रणेला सहकार्य करण्यास आणि त्यांच्या पहिल्या सोशल नेटवर्कच्या युजर्सचा एन्क्रिप्टेड डेटा देण्यास नकार दिल्यानंतर दुरोव यांनी रशिया सोडला होता.
-
२०१८ ते २०२१ पर्यंत रशियामध्ये टेलिग्रामवर बंदी घालण्यात आली होती. २०१८ मध्ये दुरोव यांनी त्यांचा भाऊ निकोलाई यांच्यासह, TON ही ब्लॉकचेन प्रणाली तयार करण्यासाठी गुंतवणूकदारांकडून १.७ अब्ज डॉलर्स उभारले होते. पण, SEC ने त्यावर बंदी घातल्यानंतर ते बंद करण्यात आले.
-
पावेल दुरोव यांनी २०२१ मध्ये फ्रेंच नागरिकत्व स्वीकारले पण ते दुबईमध्ये राहतात. फोर्ब्स अब्जाधीशांच्या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, त्यांना पाच मुले आहेत. यापूर्वी, दुरोव यांनी असा दावा केला आहे की, त्यांनी शुक्राणू दान केल्यामु ते १०० मुलांचे पिता आहेत. (All Photos: @durov/Instagram)
‘मला किती मुले आहेत हे मलाच माहित नाही’, Telegram चे संस्थापक पावेल दुरोव असे का म्हणाले?
Telegram founder Pavel Durov personal life: रशियाच्या गुप्तचर यंत्रणेला सहकार्य करण्यास आणि त्यांच्या पहिल्या सोशल नेटवर्कच्या युजर्सचा एन्क्रिप्टेड डेटा देण्यास नकार दिल्यानंतर दुरोव यांनी रशिया सोडला होता.
Web Title: Telegram founder pavel durov unknown number of children personal life dubai richest man aam