• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. hardik pandyas 6000 sqft penthouse in gujarat sgy

हार्दिक पांड्याचं ६००० स्क्वेअर फुटांचं अलिशान पेंटहाऊस, दिग्गजांनाही लाजवेल असं राहणीमान

भारतीय क्रिकेट संघातील अष्टपैलू खेळाडू म्हणून हार्दिक पांड्याला ओळखलं जातं

May 21, 2020 19:50 IST
Follow Us
  • भारतीय क्रिकेट संघातील अष्टपैलू खेळाडू म्हणून हार्दिक पांड्याला ओळखलं जातं. मैदानावर नेहमी आक्रमक असणारा हार्दिक पांड्या खऱ्या आयुष्यात खूपच स्टायलिश आणि अलिशान आयुष्य जगतो. गुजरातमधील वडोदरामध्ये हार्दिक पांड्याचं ६००० स्क्वेअऱ फुटांचं पेंटहाऊस आहे. (Photo: Instagram)
    1/26

    भारतीय क्रिकेट संघातील अष्टपैलू खेळाडू म्हणून हार्दिक पांड्याला ओळखलं जातं. मैदानावर नेहमी आक्रमक असणारा हार्दिक पांड्या खऱ्या आयुष्यात खूपच स्टायलिश आणि अलिशान आयुष्य जगतो. गुजरातमधील वडोदरामध्ये हार्दिक पांड्याचं ६००० स्क्वेअऱ फुटांचं पेंटहाऊस आहे. (Photo: Instagram)

  • 2/26

    वडोदरामध्ये असणाऱ्या या पेंटहाऊसमध्ये हार्दिक पांड्या आपल्या संपूर्ण कुटुंबासोबत राहतो. (Photo: Instagram)

  • 3/26

    हार्दिक पांड्याचं हे घर Olives Cre त्या क्रिएटिव्ह डायरेक्टर अनुराधा अग्रवाल यांनी डिझाईन केलं आहे. हार्दिकने घर सजवताना प्रत्येकाच्या व्यक्तिमत्त्वाला साजेल अशीच सजावट करण्यास सांगितलं होतं. (Photo: Architectural Digest India)

  • 4/26

    हार्दिक पांड्याच्या घरात खासगी चित्रपटगृह, जीम, लिव्हिंग रुम तसंच गार्डन आहे. (Photo: Architectural Digest India)

  • 5/26

    कुणाल पांड्याची बेडरुम (Photo: Architectural Digest India)

  • 6/26

    घरात चार बेडरुम असून तिथे आई-वडील आणि भावंडं राहतात. (Photo: Architectural Digest India)

  • 7/26

    हार्दिकच्या घरात अनेक अँटिक गोष्टीदेखील पहायला मिळतात. (Photo: Instagram)

  • 8/26

    घरात क्रिकेट खेळतानाचा व्हिडीओ हार्दिकने नुकताच शेअर केला होता. (Photo: Instagram)

  • 9/26

    हार्दिक पांड्याने घरात जीमही तयार करुन घेतली आहे. (Photo: Instagram)

  • 10/26

    हार्दिकसोबत त्याचा भाऊ कृणाल पांड्या, वहिनी तसंच आई-वडील राहतात. (Photo: Instagram)

  • 11/26

    हार्दिक आणि कृणाल घरात नेहमी कॅरोके साँगवर धमाल करत असतात. (Photo: Instagram)

  • 12/26

    हार्दिकला कुत्र्यांची फार आवड असून इन्स्टाग्रामवर तो नेहमी त्यांचे फोटो शेअर करत असतो (Photo: Instagram)

  • 13/26

    हार्दिक पांड्या भारतीय क्रिकेट संघातील महागड्या खेळाडूंपैकी एक आहे. हार्दिक वर्षाला जवळपास ११ कोटींची कमाई करतो. (Photo: Instagram)

  • 14/26

    हार्दिक पांड्याची सर्वात जास्त कमाई आयपीएलमधून होते. Celebrity Earnings नुसार आतापर्यंत आयपीएलमधून त्याने १२ ते १३ कोटी कमावले आहेत. (Photo: Instagram)

  • 15/26

    हार्दिक पांड्या गेल्या तीन वर्षांपासून भारतीय क्रिकेट संघाचा भाग आहे. बीसीसीआयकडून हार्दिकला वर्षाला तीन कोटी मिळतात. याशिवाय भारतीय आणि मुंबई इंडियन्स संघाकडून मिळणाऱ्या मॅच फीमधूनही त्याची कमाई होते. (Photo: Instagram)

  • 16/26

    जगातील सर्वात श्रीमंत बोर्डपैकी एक असणारी बीसीसीआय हार्दिकपला ३ ते ८ लाख रुपये मॅच फी देतं. याशिवाय परफॉर्मन्स बोनस मिळतो तो वेगळा. याशिवाय हार्दिक अनेक ब्रॅण्ड्सच्या जाहिराती करतो. यामध्ये boAt, Sin Denim, Oppo, Gulf Oil याशिवाय इतर जाहिरातींचा समावेश आहे.

  • 17/26

    हार्दिकला गाड्यांचंही प्रचंड वेड असून अनेक अलिशान गाड्या तो वापरतो (Photo: Instagram))

  • 18/26

    हार्दिकचं मुंबईतदेखील घर आहे. येथेही पांड्या कुटुंब एकत्रित वेळ घालवत असतं.

  • 19/26

    आपल्या अष्टपैलू कामगिरीमुळे हार्दिकची भारतीय संघात निवड झाली आणि मग त्याने अनेक सामने भारतीय संघाला जिंकून दिले. तेथून खऱ्या अर्थाने हार्दिकच्या यशस्वी वाटचालीस सुरुवात झाली. (Photo: Instagram)

  • 20/26

    हार्दिक पांड्या आज अलिशान आयुष्य जगत असला तरी यासाठी त्याला खूप संघर्ष करावा लागला आहे. (Photo: Instagram)

  • 21/26

    हार्दिक पंड्याला क्रिकेट खेळता यावं यासाठी त्याच्या वडिलांनी सूरतमधील व्यवसाय बंद करुन वडोदरा येथे स्थायिक झाले होते. वडोदरामधील किरण मोरे अकॅ़डमीत त्यांनी हार्दिकला दाखल केलं होतं. (Photo: Instagram)

  • 22/26

    हार्दिकला पहिल्यापासून क्रिकेटची प्रचंड आवड होती. यासाठी त्याने आपलंही शिक्षणही नववीनंतर सोडून दिलं होतं. (Photo: Instagram)

  • 23/26

    हार्दिकच्या या निर्णयाला त्याच्या वडिलांकडून पूर्ण समर्थन होतं. (Photo: Instagram)

  • 24/26

    २०१५ मध्ये हार्दिक पांड्याची आयपीएमध्ये मुंबई इंडियन्स क्रिकेट संघात निवड झाली आणि त्याच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. हार्दिसोबत कृणाल पांड्यालाही मुंबईने विकत घेतलं होतं. (Photo: Instagram)

  • 25/26

    आयपीएल ट्रॉफी जिंकल्यानंतर मुंबई इंडियन्सकडून प्रत्येक खेळाडूला ५० लाखांचा चेक देण्यात आला होता. (Photo: Instagram)

  • 26/26

    एका मुलाखतीत बोलताना हार्दिकने अचानक इतके पैसे आल्यानंतर काय करायचं हेच कळत नव्हतं सांगितलं होतं. सुरुवातीला त्यांनी त्या पैशांमध्ये सर्व कर्ज फेडली. (Photo: Instagram)

Web Title: Hardik pandyas 6000 sqft penthouse in gujarat sgy

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.