-
श्रीकृष्ण जन्माष्टमीला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. भगवान विष्णूचा आठवा अवतार म्हणून श्रीकृष्ण भगवानला मानले जाते.
-
देशभरात हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. त्यातही गोकुळ, मथुरा, वृंदावन, द्वारका, पुरी या ठिकाणी या उत्सवाला विशेष महत्त्व आहे.
-
कृष्णाच्या जन्माचा हा दिवस एखाद्या सोहळ्याप्रमाणे साजरा करण्याची पद्धत आहे. या दिवशी उपवास करुन कृष्णाची मनोभावे पूजा केली जाते.
-
एखाद्या लहान बाळाप्रमाणे कृष्णमूर्तीला आंघोळ घालून त्याच्यासमोर भक्तीगीते म्हणून हा उत्सव साजरा केला जातो.
-
श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने राज्यातील अनेक कृष्ण मंदिरात गर्दी पाहायला मिळत आहे.
-
मुंबई, नवी मुंबई, ठाणे यांसह ठिकठिकाणी पारंपारिक पद्धतीने श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी केली जात आहे.
-
यानिमित्ताने अनेक मंदिरांना सजावट करण्यात आली आहे. तसेच भक्तांकडून प्रथेनुसार पुजाही केली जात आहे.
-
दरम्यान राज्यातील बहुतांश मंदिर बंद असल्याने अनेक भाविक घरातच श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी करत आहेत.
-
गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही गोपाळकाल्यावर करोनाचे सावट पाहायला मिळत आहे. त्यामुळे ठिकठिकाणी आयोजित केला जाणार दहिकाला उत्सव रद्द करण्यात आला आहे.
-
(सर्व फोटो – अमित चक्रवर्ती, इंडियन एक्सप्रेस)
सजावट झाली, पाळणाही सजला; जन्माष्टमीचा उत्साह शिगेला
Web Title: Maharashtra devotees at lord shri krishna temple on occasion of happy krishna janmashtami 2021 puja celebrations covid 19 rules photos sdn