• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • वाशिम
    • बुलढाणा
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
    • इन्फ्रास्ट्रक्चर
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • कायदा
    • राजकारण
    • इतिहास
    • पर्यावरण
    • अर्थकारण
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • करिअर
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • आजचे भविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • ट्रेंडिंग
    • रेसिपी
    • लाइफस्टाइल
    • ऑटो
    • तंत्रज्ञान
    • FYI
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • चतुरा
  • फोटो
    • वेब स्टोरीज
    • व्हिडिओ
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • क्विझ – दीपिका पादुकोण
  • राज ठाकरे
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. celebrities who named their daughter india scsg

Photos: ‘या’ सेलिब्रिटींनी आपल्या मुलीचं नाव ठेवलं ‘India’; एका ‘इंडिया’ला तर मोदींनीही दिलेल्या शुभेच्छा

ही यादी पाहिल्यावर लक्षात येईल की जगातील वेगवेगळ्या देशांमधील, वेगवेगळ्या क्षेत्रातील नामवंत सेलिब्रिटींनी आपल्या मुलींचं नाव इंडिया असं ठेवलं आहे

June 19, 2021 18:04 IST
Follow Us
  • Rahul Gandhi Tweet
    1/25

    काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी केलेल्या एका ट्विटमुळे आज इंडिया या शब्द चर्चेत आहे. राहुल गांधींच्या ट्विटमुळे इंडिया शब्द चर्चेत असला तरी यापूर्वी अनेक सेलिब्रिटींनी त्यांच्या दांपत्याला इंडिया हे नाव दिलं आहे. नक्की काय घडलंय आणि कोणत्या सेलिब्रिटींनी आपल्या मुलांना इंडिया नाव दिलं आहे ते पाहूयात….

  • 2/25

    घडलं काय? : महान धावपटू मिल्खा सिंग यांचं शुक्रवारी मध्यरात्री निधन झालं. उपचार सुरू असतानाच मिल्खा सिंग यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने संपूर्ण देश हळहळला. सोशल मीडियासह वेगवेगळ्या माध्यमांतून त्यांना श्रद्धांजली अपर्ण केली जात असून, काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनीही ट्विट करत अभिवादन केलं. मात्र, राहुल गांधी श्रद्धांजली वाहताना केलेलं हे ट्वीट वेगळ्याचं कारणाने चर्चेचा विषय ठरत आहे. राहुल गांधी यांनी ट्वीटमध्ये वापरलेल्या एका इंग्रजी शब्दावर आक्षेप घेत अनेकांनी त्यांची थट्टा केली.

  • 3/25

    राहुल गांधींनी आपल्या ट्विटच्या शेवटच्या वाक्यात भारत तुम्हाला कायम लक्षात ठेवेल असं इंग्रजीमध्ये म्हणताना India चा उल्लेख She म्हणजेच स्त्रीलींग केलाय. त्यावरून अनेकांनी राहुल गांधी यांच्या इंग्रजीबद्दलच्या ज्ञानाची थट्टा उडवली आहे. India हा शब्द पुल्लिंगी असून, he ऐवजी her वापरलं असल्याचं सांगत राहुल गांधी भारत शब्दाचं जेंडर बदलल्यांचं अनेकांनी म्हटलं आहे. पण यापूर्वीही अनेक सेलिब्रिटींनी आपल्या मुलींचं नावं इंडिया असं ठेवलं आहे. पाहुयात असेच काही सेलिब्रिटी आणि त्यांच्या मुलींची नावं नक्की काय आहेत.

  • 4/25

    दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू जाँटी ऱ्होड्सने आपल्या मुलीचं नाव इंडिया असं ठेवलं आहे. जाँटीच्या मुलीचं नाव इंडिया जेनी ऱ्होड्स असं आहे.

  • 5/25

    जाँटीने एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये मुलीचं नाव इंडिया का ठेवलं यासंदर्भात भाष्य केलेलं.

  • 6/25

    ”भारताची विविधतेने नटलेली समृद्ध संस्कृती, हजारो वर्षांचा ऐतिहासिक वारसा, विविध भाषा आणि धर्मांचे एकोप्याने नांदणारे लोक हे सारंच जगाच्या पाठीवर क्वचितच पाहायला मिळते. भारतात दर दिवशी तुम्हाला वेगळा अनुभव येतो, दरदिवशी नव्याने भारताची वेगवेगळी रुपं समोर येतात. भारतातल्या माझ्या वास्तव्याच्या काळात खूप अनुभव घेता आले. इथली माणसं त्यांच्या स्वभाव सारं काही इथे येणाऱ्या प्रत्येकाला आपलंस करतं, मोठी झाल्यावर माझ्याही मुलीला तिच्या नावाचा अर्थ कळेल आणि तीही आमच्यासारखी भारताचा नव्याने शोध घेईल,” असं तो म्हणाला होता.

  • 7/25

    २०१५ मध्ये जाँटी ऱ्होड्सच्या मुलीचा मुंबईत जन्म झाला.

  • 8/25

    तिच्या जन्मावेळी जाँटीने इथल्या मंदिरात पूजाही केली होती.

  • 9/25

    अमेरिकन अभिनेत्री मारीसोल निकोलसने आपल्या मुलीचं नाव इंडिया असं ठेवलं आहे.

  • 10/25

    मारीसोल निकोलसच्या मुलीचा जन्म २००८ साली सप्टेंबर महिन्यामध्ये झाला.

  • 11/25

    सध्या मारीसोल निकोलस ही सिंगल मदर असून तिने २०२० साली आपल्या पतीपासून घटस्फोट घेतलाय. इंडिया तिच्यासोबतच राहते.

  • 12/25

    प्रसिद्ध हॉलिवूड निर्माते हार्वी विस्टीन यांनीही आपल्या मुलीचे नाव इंडिया असं ठेवलं आहे.

  • 13/25

    हार्वी यांना एकूण पाच मुलं असून त्यापैकी एका मुलीचं नाव इंडिया पिरल विस्टीन असं आहे.

  • 14/25

    अमेरिकेतील गीतकार एरिक बेनेटनेही आपल्या मुलीचं नाव इंडिया असं ठेवलं आहे.

  • 15/25

    एरिकला तीन मुली असून त्यापैकी एका मुलीचं नाव इंडिया असं आहे.

  • याशिवाय कॅनडामधील लोकप्रिय गायिका सारा मॅकलननेही आपल्या मुलीचं नाव इंडिया असं ठेवलं आहे.
  • 16/25

    साराचे पती अश्विन सूद हे मुळचे भारतीय होते. ते एक उत्तम संगीतकार होते.

  • 17/25

    मार्वल चित्रपटांमध्ये थॉरची भूमिका साकारणाऱ्या आणि भारतामध्येही प्रचंड लोकप्रिय असणाऱ्या ख्रिस हॅम्सवर्थनेही आपल्या मुलीचं नाव इंडिया असं ठेवलं आहे.

  • 18/25

    ख्रिसच्या मुलीचं नाव इंडिया रोज असं आहे.

  • 19/25

    ब्रिटीश अभिनेत्री एमा फर्ग्युसनने आपल्या मुलीचं नाव इंडिया असं ठेवलं आहे. एमाच्या मुलीचं संपूर्ण नाव इंडिया फॉक्स ओवेन असं आहे. (प्रातिनिधिक फोटो)

  • 20/25

    इंडिया जेनी ऱ्होड्सला तर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही शुभेच्छा दिलेल्या.

  • 21/25

    २३ एप्रिल २०१७ रोजी जाँटीने पोस्ट केलेला फोटो मोदींनी कोट करुन रिट्विट करत, "Happy birthday to India, from India" असं म्हटलं होतं.

  • 22/25

    यावर जाँटीने रिप्लाय करत मोदींचे आभार मानताच, बेबी इंडिया तिच्या जन्मभूमीत खूप आनंदात असल्याचं म्हटलं होतं.

  • 23/25

    आता ही यादी पाहिल्यावर लक्षात येईल की या सर्व सेलिब्रिटींनी आपल्या मुलींचं नाव इंडिया ठेवलं आहे. एकाही सेलिब्रिटीने आपल्या मुलाला इंडिया हे नाव दिलेलं नाही.

  • 24/25

    त्यामुळेच राहुल गांधींच्या ट्विटमध्ये इंडियाचा उल्लेख ती असा करणं हे पूर्णपणे चूक आहे असं म्हणता येणार नाही. (सर्व फोटो : ट्विटर, इन्स्ताग्राम, रॉयटर्सवरुन साभार)

Web Title: Celebrities who named their daughter india scsg

IndianExpress
  • India stresses on roadmap of permanent engagement, de-escalation to solve border issues with China
  • Woman raped in Kolkata law college, 3 men arrested
  • For first time in 2 decades, Uddhav, Raj Thackeray to come together to protest ‘Hindi imposition’ in Maharashtra schools
  • ‘India going to open up’: Trump on trade deal as Indian officials reach US; agri still a sticking point
  • The Emergency, 50 years on: A father’s fight to ensure son’s death wasn’t lost in the darkness
Follow Us
  • Facebook
  • Twitter
Download Apps
  • Play_stor
  • Apple_stor
Express Group
  • The Indian Express
  • The Financial Express
  • Jansatta
  • IeTamil.Com
  • IeMalayalam.Com
  • IeBangla.Com
  • ieGujarati.com
  • inUth
  • IE Education
  • The ExpressGroup
  • Ramnath Goenka Awards
Quick Links
  • Privacy Policy
  • Terms and Conditions
  • Indian Express Group
  • Advertise With Us
  • Contact us
  • This Website Follows The DNPA’s Code Of Conduct
  • About Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.