-   भारतीय प्रशासकीय सेवा (IAS) अधिकारी आणि श्रीनगर महानगरपालिकेचे आयुक्त अतहर आमिर खान पुन्हा लग्न करणार आहेत. 
-  यापूर्वी अतहर आमिर खानने आयएएस टॉपर टीना दाबीसोबत लग्न केले होते, मात्र हे नाते फार काळ टिकले नाही. 
-  २०१५ मध्ये, दिल्लीच्या टीना दाबीने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) नागरी सेवा परीक्षेत अव्वल क्रमांक मिळवला होता. 
-  त्याच वर्षी जम्मू आणि काश्मीरच्या अतहर आमिरने यूपीएससीमध्ये दुसरा क्रमांक मिळवला होता. 
-  मसुरीमध्ये प्रशिक्षणादरम्यान दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले आणि प्रशिक्षण संपल्यानंतर २०१८ मध्ये त्यांनी लग्न केले. 
-  तथापि, हे लग्न फार काळ टिकले नाही आणि २०२१ मध्ये टीना आणि अतहर वेगळे झाले. 
-  आता, काश्मीरमधील डॉक्टर मेहरीन काझी त्यांच्याशी अतहर आमिर खान लग्नगाठ बांधणार आहेत. 
-  काश्मीरमधील अनंतनाग येथील रहिवासी आयएएस अतहर आमिर खान आणि डॉ. मेहरीन काझी यांनी शनिवारी रात्री सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या नात्याचा खुलासा केला. 
-  दोघांचा साखरपुडा झाला असून मीडिया रिपोर्ट्सनुसार, डॉक्टर मेहरीन या श्रीनगरमधील लाल बाजार येथील रहिवासी आहेत. 
-  डॉ. मेहरीन काझी आजकाल राष्ट्रीय राजधानी नवी दिल्लीतील राजीव गांधी कर्करोग संस्था आणि संशोधन केंद्रात कार्यरत आहेत. 
-  मेडिको असण्यासोबतच त्या फॅशन इंडस्ट्रीतही सक्रिय आहे. 
-  त्या महिलांशी संबंधित ब्रँडचा प्रचार करतात. इंस्टाग्रामवर त्यांचे २ लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. 
-  मेहरीन मेडिसिनमध्ये एमडी आहे. त्यांनी पंजाबमधील फरीदकोट, दिल्लीतील आंबेडकर विद्यापीठ, यूके आणि जर्मनी येथे शिक्षण घेतले आहे. 
-  मेहरीन आणि अतहर बऱ्याच काळापासून एकमेकांना डेट करत आहे. 
-  शनिवारी रात्री उशिरा खान यांनी त्यांच्या फेसबुक वॉलवर या गोष्टीची पुष्टी केली. त्याचवेळी डॉ. मेहरीन काझी यांनीही त्यांचे नाते सर्वांसमोर आणले आहे. 
-  असे मानले जाते की या जोडप्याचा मे महिन्यातच साखरपुडा झाला होता आणि या वर्षी ऑक्टोबरमध्ये ते लग्न करणार आहेत. 
-  दुसरीकडे, आयएएस अतहर आमिरची पहिली पत्नी टीना दाबीनेही घटस्फोटानंतर आयएएस प्रदीप गावंडे यांच्याशी लग्न केले. 
-  प्रदीप राजस्थानच्या पुरातत्व विभागाचे संचालक आहेत. टीना आणि प्रदीप दोघेही राजस्थान केडरमध्ये कामकाज पाहत आहेत. 
-  (सर्व फोटो : इन्स्टाग्राम आणि फेसबुक) 
Photos : टीना दाबीपासून घटस्फोट घेतल्यानंतर अतहर आमिर खान लवकरच अडकणार लग्नबंधनात; पाहा कोण आहे होणारी बायको
भारतीय प्रशासकीय सेवा (IAS) अधिकारी आणि श्रीनगर महानगरपालिकेचे आयुक्त अतहर आमिर खान पुन्हा लग्न करणार आहेत.
Web Title: Athar aamir khan to tie the knot soon after divorcing tina dabi see who is his future wife pvp