पिंपरी : सांगवी फाटा ते रावेत बीआरटीएस मार्गावरील पिंपळे निलख येथील रक्षक सोसायटी चौकात भुयारी मार्ग (सब-वे) उभारण्यात येणार आहे. त्यामुळे या रस्त्यावर होणारी वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होणार आहे. सांगवी आणि औंध जोडणाऱ्या मुळा नदीवरील राजीव गांधी पुलापासून रावेत-किवळे बीआरटी मार्ग सुरू होतो. या रस्त्याचे दहा वर्षांपूर्वी महापालिकेने रुंदीकरण करून बीआरटी मार्गिका, मुख्य मार्ग व सेवा रस्ता निर्माण केला. त्यानंतर गेल्या दोन वर्षांतच पदपथांसह सायकल मार्ग उभारून कडेला वृक्षारोपण करून सुशोभीकरणही केले आहे. या रस्त्याने वाय जंक्शन येथून वाकड, हिंजवडी, मुंबई-बंगळूर महामार्गाला जाता येते. साई चौकातून, वाकड, पिंपळे सौदागर, पिंपरी, पुणे-मुंबई व पुणे-नाशिक महामार्गावर जाता येते. काळेवाडी फाटा येथून वाकड व काळेवाडी, चिंचवड, भोसरी एमआयडीसी आणि डांगे चौक थेरगाव येथून चिंचवड, वाल्हेकरवाडी मार्गे प्राधिकरणात जाता येते. ताथवडे, पुनावळे, रावेत हा नव्याने विकसित भागही या रस्त्याने जोडला गेला आहे. पिंपळेनिलखमधून बाणेर, बालेवाडी भागातही जाता येते. त्यामुळे या मार्गावर मोठ्या प्रमाणात रहदारी असते. हिंजवडीतील माहिती व तंत्रज्ञाननगरीतील कर्मचारी रस्त्याचा वापर करतात. त्यामुळे वाहनांची संख्या वाढून रक्षक सोसायटी चौकात नेहमीच वाहतूक कोंडी होते. त्यावर उपाययोजना म्हणून भुयारी मार्ग उभारण्याचे नियोजन महापालिकेने केले आहे.
पिंपरी : रक्षक सोसायटी चौकातील वाहतूक कोंडी सुटणार, महापालिकेने घेतला ‘हा’ निर्णय
हिंजवडीतील माहिती व तंत्रज्ञाननगरीतील कर्मचारी रस्त्याचा वापर करतात. त्यामुळे वाहनांची संख्या वाढून रक्षक सोसायटी चौकात नेहमीच वाहतूक कोंडी होते.
Written by लोकसत्ता टीम
पिंपरी चिंचवड
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 02-03-2024 at 11:59 IST
TOPICSपिंपरीPimpriपिंपरी चिंचवडPimpri Chinchwadपिंपरी चिंचवड महानगरपालिकाPimpri Chinchwad Municipal Corporationपिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्तPCMC Commissionerमराठी बातम्याMarathi News
+ 1 More
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In pimpri traffic jam problem at rakshak society chowk to be solved with the construction of subway pune print news ggy 03 css