‘जय जगन्नाथ, जय बलराम, जय सुभद्रा, हरे राम हरे कृष्णा…’ च्या जयघोषात पुणेकरांनी भगवान जगन्नाथ, भगवान बलराम आणि सुभद्रा यांच्या प्रतिमा विराजमान असलेल्या जगन्नाथ रथयात्रा सोहळ्याचे रविवारी उत्साहात स्वागत केले. आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ (इस्कॉन) पुणे यांच्यातर्फे आयोजित रथयात्रेचे ठिकठिकाणी होणारी पुष्पवृष्टीद्वारे स्वागत करण्यात आले. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ओडिसामधील जगन्नाथ पुरी येथील रथयात्रा यंदा आषाढ महिन्यात मोठया उत्साहात साजरी होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर इस्कॅान, पुणे यांच्यातर्फे लोकनाथ स्वामी महाराज, भक्ती पुरुषोत्तम स्वामी महाराज आणि  कृष्णचैतन्य स्वामी महाराज यांच्या हस्ते पूजन करून जंगली महाराज रस्त्याजवळील हॉटेल सेंट्रल पार्क येथून जगन्नाथ रथयात्रा सोहळ्याला सुरुवात झाली. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, इस्कॉन पुणेचे अध्यक्ष राधेश्याम दास, माधव जगताप, प्रशांत वाघमारे, माजी खासदार अमर साबळे, श्रीनाथ भिमाले, कृष्णकुमार गोयल, जयप्रकाश गोयल, इस्कॉन पुणेचे श्वेतद्वीप दास, नटवर दास, रेवतिपती दास हे पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune residents enthusiastically welcomed jagannath rathyatra pune print news amy
First published on: 03-07-2022 at 19:01 IST