Healthy Besan Toast recipe: लहान मुलांना अनेकदा नाश्त्यासाठी काय बनवावं ते कळत नाही. अनेकदा तेच तेच खाऊन त्यांनाही कंटाळा येतो. आणि रोज नवीन काय बनवायचं हाच प्रश्न पडतो. मुलांना डब्यात हेल्दी ऑप्शन काय द्यावे हेदेखील अनेकदा कळत नाही. म्हणून तुम्ही घरच्या घरी एक रेसिपी ट्राय करू शकता, जी झटपटही होते आणि हेल्दीदेखील आहे. चला तर मग, जाणून घेऊ या ‘हेल्दी बेसन टोस्ट रेसिपी’.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

साहित्य

१ कप बेसन

१ चमचा मीठ

१ चमचा धणेजीरं पूड

अर्धा चमचा लाल मिरची पूड

अर्धा चमचा गरम मसाला

१ चिरलेला कांदा

अर्धा चिरलेला शिमला मिरची

१ चिरलेली हिरवी मिरची

कोथिंबीर

ब्रेड

चीज

टोमॅटो केचअप/चटणी

हेही वाचा… Crispy Twister Recipe: कुरकुरीत आणि चवदार खायचंय? मग बटाट्याची ‘ही’ रेसिपी ट्राय कराच

रेसिपी

  1. १ कप बेसन, १ चमचा मीठ, १ चमचा धणेजीरं पूड, अर्धा चमचा हळद पूड, अर्धा चमचा लाल मिरची पूड, अर्धा चमचा गरम मसाला आणि पाणी घ्या.
  2. त्याचं एक गुळगुळीत बॅटर तयार करा.
  3. त्यात १ चिरलेला कांदा, अर्धा चिरलेला शिमला मिरची, १ चिरलेली हिरवी मिरची आणि काही कोथिंबीर टाका. चांगलं मिक्स करा.
  4. १ ब्रेड स्लाईस घ्या. त्यावर बेसन बॅटर लावा.
  5. तव्यावर थोडं तूप किंवा तेल लावा आणि ब्रेड दोन्ही बाजूंनी शिजवा.
  6. १ चीज स्लाईस घाला आणि दुसरी ब्रेड स्लाईस त्यावर ठेवा.
  7. दोन्ही बाजूंनी छान शिजवा.
  8. टोमॅटो केचअप किंवा चटणी सोबत खा.
  9. तुमचं चीज़ी बेसन टोस्ट तयार आहे. चव घेत आनंद घ्या!

हेही वाचा… Crunchy Potato Kachori: बटाट्याची खुसखुशीत कचोरी कधी खाल्ली आहे का? मग रेसिपी पटकन वाचा

पाहा व्हिडीओ

*ही रेसिपी @khana_peena_recipe या इन्स्टाग्राम अकाउंटवरून घेण्यात आली आहे.

मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Healthy besan toast recipe in marathi dvr