Methi Papad : मेथी ही आपल्या आरोग्यासाठी अत्यंत पोषक आहे. हिवाळा आला की आपण आवडीने मेथीची भाजी, पराठा, आळण, बेसन, भजे बनवतो पण तुम्ही कधी मेथीचे पापड खाल्ले का? मेथीचे पापड हे बनवायला अत्यंत सोपी असून चवीला खूप स्वादिष्ट वाटतात. विशेष म्हणजे हे पापड एकदा बनवले की तुम्ही वर्षभर खाऊ शकता. आज आपण ही रेसिपी जाणून घेणार आहोत.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
साहित्य
- मेथी
- बटाटा
- लाल मिरची
- चाट मसाला
- हिंग
- मीठ
- बेकींग सोडा
हेही वाचा : तरुणींना लाजवेल असा आजीचा उत्साह, आजीने केला पंजाबी डान्स; व्हिडीओ पाहा
कृती
- मेथी स्वच्छ धुवून घ्या आणि मिक्सरमधून बारीक करा
- बटाटा उकळून घ्या आणि चांगला कुस्करुन घ्या
- या बटाट्याच्या मिश्रणामध्ये बारीक केलेली मेथी टाका.
- त्यात बारीक चिरलेली लाल मिरची, चाट मसाला, हिंग, मीठ आणि बेकिंग सोडा त्यात टाका.
- त्यानंतर हे मिश्रण एकत्र करा आणि त्याचे छोटे छोटे गोळे करा.म
- पुरी मशीनद्वारे किंवा लाटून तुम्ही पापड लाटून घ्या.
- त्यानंतर उन्हामध्ये हे पापड वाळवा.
- पापड वाळल्यानंतर हे पापड तुम्ही वर्षभर तळून खाऊ शकता.
First published on: 01-12-2023 at 14:42 IST
मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Methi papad recipe how to make methi papad do it once and eat whole year note recipe indian food news ndj