scorecardresearch

Premium

तरुणींना लाजवेल असा आजीचा उत्साह, आजीने केला पंजाबी डान्स; व्हिडीओ पाहा

व्हिडीओमध्ये एक आजी भन्नाट डान्स करताना दिसत आहे. आजीचा उत्साह आणि ऊर्जा पाहून कोणीही थक्क होईल.

an old ladya panjabi dance or bhangra dance video goes viral on social media
तरुणींना लाजवेल असा आजीचा उत्साह, आजीने केला पंजाबी डान्स; व्हिडीओ पाहा (Photo : Instagram)

Viral Video : सोशल मीडियावर अनेक डान्स व्हिडीओ व्हायरल होत असतात. लहानांपासून वयोवृद्ध लोकांपर्यंत अनेक जण डान्स करतानाचे व्हिडीओ शेअर करत असतात. सध्या असाच एक डान्स व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक आजी भन्नाट डान्स करताना दिसत आहे. आजीचा उत्साह आणि ऊर्जा पाहून कोणीही थक्क होईल.
असं म्हणतात, आयुष्य एकदाच मिळतं. त्यामुळे भरभरून जगावं. वयाचं बंधन न ठेवता आयुष्यातील प्रत्येक क्षणाचा मनमुराद आनंद घ्यावा. आजीचा डान्स पाहून तुम्हालाही तेच जाणवेल.

हा व्हायरल व्हिडीओ एका कार्यक्रमातील आहे. या व्हिडीओमध्ये महिला तुफान डान्स करताना दिसत आहे. अशातच एका आज्जीने सर्वांचे लक्ष वेधले आहे. आजी भन्नाट डान्स करताना दिसत आहे. आजीने पंजाबी ड्रेस घातला असून ती पंजाबी डान्स करताना दिसत आहे. आजीच्या डान्स स्टेप्स आणि ऊर्जा पाहून तरुणीसुद्धा तिच्या समोर फिक्या पडतील. आजीचा डान्स पाहून इतर महिलासुद्धा आजीकडे कौतुकाने बघताना दिसत आहे.

Pakistani Singer Shazia Manzoor Slaps Co host on Live Show
पाकिस्तानी गायिकेला ‘हनिमून’ विषयी विचारला प्रश्न; लाइव्ह शोमध्येच होस्टच्या कानाखाली लगावली, पाहा धक्कादायक व्हिडीओ
Waiter carries more than a dozen plates at once over his one hand
VIDEO : “ऐ भाई, ज़रा संभाल के..!” वेटरची ही अनोखी कला पाहून व्हाल अवाक्, व्हिडीओ होतोय व्हायरल
young girls dance on marathi song by wearing nauvari saree
मराठी पोरींचा स्वॅग! डोळ्यावर चष्मा अन् नाकात नथ; नऊवारी नेसून तरुणींनी केला भन्नाट डान्स, व्हिडीओ व्हायरल
A video of police lathicharge on protesters in Mumbai is being shared as Haldwani violence.
Fact Check : लाठीचार्जचा व्हायरल व्हिडिओ उत्तराखंडमधील हलद्वानीचा नव्हे तर मुंबईतील घाटकोपरचा! जाणून घ्या काय आहे सत्य?

हेही वाचा : “प्रेम म्हणजे काय असतं, बायकोला महागडी गिफ्ट देणं असतं?” महिलेने घेतला भन्नाट उखाणा, VIDEO पाहाच

the.bhangra.lover या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “पंजाबी लग्न गाण्याशिवाय अपूर्ण आहे.” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “महिलांना आनंद घेताना पाहून खूप छान वाटले. काय उत्साह आहे..” तर एका युजरने लिहिलेय, “या वयात इतका सुंदर डान्स” आणखी एका युजरने लिहिलेय, “वाह.. खूप सुंदर जितकं कौतुक करावं तितकं कमी”

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: An old ladya panjabi dance or bhangra dance video goes viral on social media ndj

First published on: 01-12-2023 at 10:05 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×