बाजारात दररोज नवनवीन स्मार्टफोन लाँच होत असतात. आजकाल Apple iPhone 14 मालिकेबद्दल खूप चर्चा होत आहे, परंतु जर तुम्ही अँड्रॉइडचे चाहते असाल आणि नवीन फोन घेण्याचा विचार करत असाल, तर थोडी प्रतीक्षा करा. कारण ऑगस्टमध्ये Redmi, Realme, Vivo त्यांचे नवीन फोन लाँच करण्यासाठी सज्ज आहेत. जाणून घेऊया ऑगस्टमध्येबभारतात कोणते फोन लाँच होणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Vivo V25 Pro

Vivo १७ ऑगस्ट रोजी भारतात आपले नवीनतम डिव्हाइस V25 Pro लाँच करण्यासाठी सज्ज आहे. लाँच होण्याआधी फोनबाबत अनेक रिपोर्ट्स समोर आल्या आहेत. माहितीनुसार, फोन MediaTek Dimensity १३०० द्वारे समर्थित असेल, जो Mali-G77 MC9 GPU सह जोडलेला असेल. तसंच फोनची रॅम ८जीबी पर्यंत वाढवली जाईल. या फोनच्या कॅमेराबद्दल बोलायला गेलं, तर फोन ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप सह येईल. हे ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन (OIS) सपोर्ट आणि व्लॉग मोड, हायब्रिड इमेज स्टॅबिलायझेशनसह ६४एमपी मुख्य कॅमेरासह येईल. फोनमध्ये ६६वोल्ट फ्लॅश चार्ज फास्ट चार्जिंग सपोर्टसह ४८३०एमएएच बॅटरी असण्याची अपेक्षा आहे.

( हे ही वाचा: Jio Airtel 5G Launch: जाणून घ्या 5G लाँचची तारीख, किंमत, स्पीड आणि इतर तपशील)

Realme 9i 5G

रिअलमी चा हा स्मार्टफोन १८ ऑगस्ट रोजी दुपारी १२:३० वाजता लाँच होईल. विशेष बाब म्हणजे हा ५जी फोन ग्राहकांना MediaTek Dimensity ८१० ५जी चिपसेट, मोठी बॅटरी आणि ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपसह येतो. Realme 9i 5G हा Realme 9i चा एक प्रकार आहे जो या वर्षी जानेवारीमध्ये लाँच झाला होता. कॅमेराबद्दल बोलायला गेलं, तर Realme 9i मध्ये तीन रियर कॅमेरे देण्यात आले आहेत. यामध्ये, त्याचा प्राथमिक कॅमेरा ५० मेगापिक्सेलचा आहे, जो अपर्चर f/१.८ सह येतो.

Xiaomi 12 Lite

Xiaomi 12 Lite भारतीय बाजारपेठेत ऑगस्टमध्ये लाँच होण्याची शक्यता आहे. हा फोन ऑगस्टच्या अखेरीस सादर केला जाईल अशी अपेक्षा वर्तवण्यात येत आहे. मात्र, फोनच्या लाँचची तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. या फोनमध्ये ६.५५ इंच एमोलेड स्क्रीन आहे, जी १२०Hz रिफ्रेश रेटसह येऊ शकते. Xiaomi १२ Lite मध्ये Qualcomm Snapdragon ७७८G प्रोसेसर,८जीबी पर्यंत रॅम आणि २६५जीबी पर्यंत अंतर्गत स्टोरेज सारखी वैशिष्ट्ये दिली जाऊ शकतात.

( हे ही वाचा: Moto Razr 2022 फोल्डेबल स्मार्टफोन 50MP कॅमेरासह भारतात लाँच; जाणून घ्या किमंत आणि बरंच काही..)

Realme GT Neo 3T

या फोनच्या लॉन्चची तारीख अधिकृतपणे समोर आलेली नाही, परंतु ऑगस्टच्या अखेरीस हा फोन सादर केला जाईल असे सांगितले जात आहे. या Realme फोनमध्ये FHD+ रिझोल्यूशनसह ६.२२इंच E4 AMOLED स्क्रीन असण्याची अपेक्षा आहे. यात Qualcomm Snapdragon ८७० octa-core प्रोसेसर मिळण्याची शक्यता आहे. फोनमध्ये ८जीबी रॅम दिली जाऊ शकते.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Are you thinking of getting a new phone these budget phones will be launched in august gps
First published on: 17-08-2022 at 16:54 IST