गुगल मॅपमुळे एखादं ठिकाण शोधणं सोपं झालं आहे. त्यामुळे वेळेची बचत होते आणि चुकीच्या ठिकाणी जाण्याचा प्रश्न येत नाही. त्यामुळे हल्ली लोकांना पत्ता विचारण्याऐवजी गुगल मॅपवर लोकेशन सेट करून जाता येतं. त्यामुळे गुगल मॅप प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये असतंच असतं. आता गुगल मॅप अ‍ॅपच्या माध्यमातून चालकांना आणखी एक मदत होणार आहे. गुगल मॅपवरून आता टोलची माहिती मिळणार आहे. इच्छित ठिकाणी जाण्यासाठी एकदा लोकेशन सेट केलं की, वाटेत येणारे टोल आणि त्याचं शुल्क किती आहे? याबाबत माहिती मिळणार आहे. त्याबरोबर या सुविधेद्वारे टोल मार्ग निवडायचा की टोल नसलेला मार्ग निवडायचा हे सुद्धा ठरवता येईल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारत, इंडोनेशिया, जपान आणि अमेरिकेतील गुगल मॅप वापरणाऱ्यांना कोणत्याही प्रवासापूर्वी टोल चार्जेसची माहिती मिळेल, असे गुगलने म्हटले आहे. हे अपडेट फक्त काही वापरकर्त्यांसाठी जारी केले गेले आहे परंतु या महिन्याच्या अखेरीस सर्वांसाठी जारी केले जाईल. इतर देशांमध्ये, हे फिचर या वर्षाच्या अखेरीस येईल. नवीन अपडेटनंतर गुगल मॅप वापरकर्त्यांच्या पेमेंट मोडसह टोल आणि त्याची किंमत याबद्दल माहिती देईल. नवीन वैशिष्ट्य सुमारे २००० टोल रस्त्यांसाठी उपलब्ध आहे.

Renault Duster बद्दल मोठी बातमी, SUV भारतात बंद होणार आहे का? जाणून घ्या कारण

नवीन अपडेट Apple Siri ला देखील सपोर्ट करेल, म्हणजेच Apple Siri च्या मदतीने तुम्ही नेव्हिगेशन देखील वापरू शकाल. नवीन अपडेटनंतर Apple Watch मध्ये गुगल मॅप वापरण्याची पद्धत बदलेल. आता अॅपल वॉचमध्ये स्वयंचलित नेव्हिगेशन दिसेल. वापरकर्ते “Take Me Home” शॉर्टकट स्क्रीन देखील जोडण्यास सक्षम असतील.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Latest update in google maps will provide information on toll tax in advance rmt