रेनॉल्ट इंडियाने त्यांच्या अधिकृत वेबसाइटवरून डस्टर एसयूव्ही डिलिस्ट केली आहे. २०१२ मध्ये भारतात पदार्पण केलेल्या एसयूव्हीला यावर्षी देशात १० वर्षे पूर्ण होत आहेत. रेनॉल्टने अधिकृतपणे याबाबतची माहिती दिली नसली तरी, एसयूव्हीचं उत्पादन भारतातील देशांतर्गत बाजारपेठेत संपुष्टात येऊ शकते. रेनॉल्ट इंडियाच्या सध्याच्या पोर्टफोलिओमध्ये आता Kwid, Triber आणि Kiger यांचा समावेश आहे.

रेनॉल्ट डस्टरची वैशिष्ठ्ये म्हणजे १७ इंच अलॉय व्हील, क्रूझ कंट्रोल, इलेक्ट्रिकली फोल्ड करण्यायोग्य ORVM, रिव्हर्स पार्किंग कॅमेरा, एक उंची-अॅडजस्टेबल ड्रायव्हर सीट, ड्रायव्हर आर्मरेस्ट, अँड्रॉइड ऑटो कनेक्टिव्हिटी, अ‍ॅप्पल कारप्ले आणि सात इंची टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम आहे. . रेनॉल्ट डस्टर दोन पेट्रोल पॉवरट्रेनद्वारे समर्थित होते. १.५ लीटर मिल १०५ बीएचपी आणि १४२ एनएम टॉर्क निर्माण करण्यासाठी ट्यून करण्यात आली होती. तर १.३-लीटर टर्बो पेट्रोल मोटरने १५४ बीएचपी आणि २५४ एनएम पीक टॉर्क निर्माण करते. सर्वात आधी पाच-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्ससह हे मॉडेल आले होते. त्यानंतर सहा-स्पीड मॅन्युअल आणि सीव्हीटी युनिटसह जोडलेले होते.

मर्सिडीजने २०२१-२०२२ दरम्यान विकलेल्या काही गाड्या परत मागवल्या, कारण…

असं असलं तरी डस्टरचं अपडेटेड मॉडेल विकसित होत असल्याची चर्चा आह. ही एसयूव्ही मुख्यत्वे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेकडे लक्ष्य ठेवून तयार केली जात आहे. कदाचित भारतीय बाजारपेठेतही प्रवेश करेल परंतु अद्याप काहीही अधिकृत पुष्टी झालेली नाही. सध्या बाजारात होत असलेली चर्चा खरी ठरली तर नवीन स्पर्धकांच्या विरूद्ध डस्टरसाठी रेनॉल्ट अधिक ताकदीने स्पर्धा करेल.