व्हॉट्सअ‍ॅप आपल्या वापरकर्त्यांचा अनुभव वाढविण्यासाठी सतत नवीन फीचर प्रदान करते. व्हॉट्सअ‍ॅपवर वापरकर्त्यांसाठी बरीच सोय करण्यात आली आहे, ज्यामुळे ते त्यांची कामे सोपी करू शकतात. व्हॉट्सअ‍ॅपवरील ग्रुप्स खूप उपयुक्त आहेत. यांच्या मदतीने एखादी माहिती एकाच वेळी अनेकांपर्यंत पोहोचते. परंतु याचे काही दुष्परिणाम देखील आहेत. जसे की जेव्हा आपण ग्रुप सोडतो तेव्हा सर्वांना याबाबत कळते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दरम्यान, व्हॉट्सअ‍ॅप सध्या अशा एका नवीन फीचरवर काम करत आहे, ज्यामुळे तुम्ही व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप सोडला तरी कोणालाही कळणार नाही. WABetaInfo च्या रिपोर्टनुसार, जेव्हा युजर एखाद्या ग्रुपमधून बाहेर पडेल तेव्हा याबद्दल अ‍ॅडमिनशिवाय कोणालाही नोटीफिकेशन मिळणार नाही.

आता अ‍ॅप न उघडताच होणार पेमेंट; जाणू घ्या Google Pay चे नवे फीचर

रिपोर्टमध्ये असेही सांगण्यात आले आहे की हे फीचर सध्या डेव्हलपमेंट स्टेजवर आहे आणि ते बीटा यूजर्सपर्यंत पोहोचण्यासाठी थोडा वेळ लागेल. कोणालाही न कळत ग्रुप सोडण्याचे हे फीचर अँड्रॉइड, आयओएस आणि डेस्कटॉप यूजर्ससाठी येईल असे मानले जात आहे. मात्र, ते कधी सादर होणार हे अजून सांगण्यात आलेले नाही.

दुसरीकडे, व्हॉट्सअ‍ॅप लवकरच ५१२ लोकांना एका ग्रुपमध्ये जोडण्याची परवानगी देईल. सध्या त्याची मर्यादा २५६ सदस्यांची आहे. याशिवाय, व्हॉट्सअ‍ॅप कम्युनिटीज टॅबवर देखील काम करत असल्याची माहिती मिळाली आहे, जी लवकरच वापरकर्त्यांसाठी सादर केली जाईल.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Notification will only go to admin after leaving whatsapp group find out what is the new feature pvp
First published on: 18-05-2022 at 15:20 IST