संकटात श्वान वाचवायला पुढे येतात असे अनेक व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील. असाच मदतीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका श्वानाने आपल्या मित्राला बुडण्यापासून वाचवल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. गॅब्रिएले कॉर्नो नावाच्या ट्विटर यूजरने हा व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये एक काळ्या श्वानाला एक पांढरे श्वान वाचवतानाचे दिसून येते.
नेमके काय झाले?
व्हिडिओमध्ये एक काळे श्वान डहाळी आणण्यासाठी नदीत उडी मारतो. मात्र पाण्याच्या वेगाने त्याचा तोल जातो आणि तो पाण्यात वाहत जातो. यावेळी श्वानाच्या तोंडात झाडाची डहाळी असते, ही डाहाळी त्या ठिकाणी एका खडकावर उभा असलेला पांढरा श्वान आपल्या जबड्यात पकडतो आणि काळ्या श्वानाला पाण्याबाहेर ओढू लागतो. त्यादरम्यान काळा श्वान देखील वेळीच सावरतो आणि बाहेर येतो. या व्हिडिओला आतापर्यंत २ दशलक्ष व्ह्यूज मिळाले आहेत. मात्र नेटकऱ्यांनी या व्हिडिओवर प्रश्न उपस्थित केले आहेत.
नेटकरी म्हणाले..
हा व्हिडिओ पाहून अनेकांनी या पांढऱ्या श्वानाचे कौतुक केले आहे. मात्र काहींना या व्हिडिओवर विश्वास बसत नाहीये. एकाने व्हिडिओ शूट करणाऱ्या कॅमेरामॅनवर प्रश्न उपस्थित केला आहे. त्याने श्वानाला वाचवण्यासाठी प्रयत्न का नाही केले, असा प्रश्न एका यूजरने केला आहे. तर एकाने या व्हिडिओवर संशय व्यक्त करत हे सुनियोजित कृत्य असल्याचे दिसून येते, असे म्हटले. तर एकाने हे कृत्य ठरवून जरी केले असले तरी यात श्वानाला मार लागला असता तर, असा गंभीर प्रश्न केला आहे.
व्हिडिओपाहून अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. महत्वाचे म्हणजे ती डहाळी पाण्यात कोणी फेकली. या घटनेत श्वान बुडाला असता तर त्याचा जीव गेला असता. हा हलगर्जीपणा कोणी केला. ही प्रश्ने अनुत्तरीत आहेत.