Viral video: सोशल मीडियावर नवरदेव आणि नवरीचे अनेक असे व्हिडिओ पाहायला मिळतात, ज्यात दोघंही लग्नासाठी अतिशय उत्सुक असतात. मात्र, अनेकदा असंही चित्र पाहायला मिळतं की नवरी आणि नवरदेवाचं स्टेजवरच भांडण सुरू झालं. आपलं लग्न इतरांपेक्षा जरा हटके आणि अविस्मरणीय करण्याची अनेकांची इच्छा असते. यासाठी वधू आणि वर दोन्हीकडून प्रयत्न सुरु असतात. आपल्या लग्नात सगळ्यांपेक्षा काहीतरी वेगळं करण्याचा सगळ्याच कपलचा प्रयत्न असतो.काहीतरी वेगळ हटके करण्याचा नादात हे नको त्या आयडिया वापरतात आणि व्हायरल होतात. सध्या असाच काहीसा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय ज्यामध्ये वधू आणि तिची बहिण नवरदेवाला जबरदस्ती डान्स करायला लावते. मात्र पुढच्याच क्षणी नवरदेवाला राग येतो आणि तो त्या दोघींसोबत विचित्र गोष्ट करतो.

नवरदेवाला जबरदस्ती नाचवल्याचा राग आला आणि त्यानं नवरीला अक्षरश: रागाच्या भरात नवरदेव वधूला ओढत, फिरवत नाचवतो. ती खाली पडली तरी तिला उठवून तिला नाचवतो. वराचा संताप वाढतो. रागाने तो वधूला ढकलून देतो. डोक्यावर घातलेला फेटाही काढून फेकतो आणि संतापात निघून जातो. यावेळी घडलेल्या या प्रसंगामुळे लग्नात आलेले लोकही अचंबित झालेले दिसतात. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हालाही धक्का बसणार आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> Video: याला म्हणतात तलफ! पठ्ठ्या आयसीयूमध्ये उपचार सुरू असताना मळतोय तंबाखू; बघून डॉक्टरही चक्रावले

नवरदेवाचा राग पाहून अनेकांनं त्याची मस्करी केली आहे. ‘ज्यादा भाव खाने के नुक़सान’, असे कॅप्शन देऊन शेअर केलेल्या या व्हिडिओवर शेकडो जणांनी कॉमेंट व्यक्त केल्या आहेत. लोकांनी हा व्हिडिओ भरपूर शेअर केला आहे. आतापर्यंत हा व्हिडिओला लाखाहून अधिकांनी लाईक केला आहे. इतकंच नाही तर तब्बल कोटींमध्ये हा व्हिडिओ पाहिला आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी अनेक मजेशीर कमेंट केल्या आहेत.