६२५ कोटींचा मालक असलेला ‘Captain America’ वापरत होता ‘हा’ जुना फोन, कारण….

नुकतंच लोकप्रिय हॉलिवूड अभिनेता ख्रिस एव्हन्स, म्हणजेच सुप्रसिद्ध ‘कॅप्टन अमेरिका’ हे पात्र साकारणाऱ्या अभिनेत्याने आपल्या स्मार्टफोनबद्दल खुलासा केला आहे.

chris evans changed his old smartphone
चाहत्यांना आश्चर्यचकित करणारी गोष्ट म्हणजे ख्रिसने आता जो फोन बदलला आहे आहे तो खूप जुना फोन आहे. (प्रातिनिधिक फोटो : Marvel Studio/Indian Express)

आज बाजारात अनेक स्मार्टफोन उपलब्ध आहे. प्रत्येकाला त्यांच्या बजेटनुसार स्मार्टफोन मिळतो. बाजारात एकापेक्षा जास्त फीचर्स असलेले अनेक स्मार्टफोन आले असले तरीही जे लोक पैसे किंवा बजेट पाहून फोन घेत नाहीत, ते सहसा अ‍ॅपलचे आयफोन खरेदी करतात. अ‍ॅपलचे स्मार्टफोन्स हे फक्त फोन नाहीत तर प्रतिष्ठेचा एक भाग मानला जातात. प्रत्येकासाठी हे फोन विकत घेणे शक्य नसले तरीही सेलिब्रिटी आणि व्यावसायिकांनी असेच फोन खरेदी करावेत अशी अपेक्षा त्यांच्याकडून केली जाते.

नुकतंच लोकप्रिय हॉलिवूड अभिनेता ख्रिस एव्हन्स, म्हणजेच सुप्रसिद्ध ‘कॅप्टन अमेरिका’ हे पात्र साकारणाऱ्या अभिनेत्याने आपल्या स्मार्टफोनबद्दल खुलासा केला आहे. यामुळे त्याचे चाहते थक्क झाले आहेत.

काही दिवसांपूर्वी ख्रिसने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली होती. यामध्ये त्याने आपल्या जुन्या स्मार्टफोनला श्रद्धांजली वाहिली आहे. चाहत्यांना आश्चर्यचकित करणारी गोष्ट म्हणजे ख्रिसने आता जो फोन बदलला आहे आहे तो खूप जुना फोन आहे. गेल्या अनेक वर्षांपासून कॅप्टन अमेरिका म्हणजेच ख्रिस एव्हन्स अ‍ॅपलच्या आयफोनचे सात वर्षे जुने मॉडेल iPhone 6s वापरत होता.

“याला म्हणतात आविष्कार”; झाडावरून फळं तोडण्यासाठी केलेल्या हटके जुगाडामुळे आनंद महिंद्रा झाले प्रभावित

चाहत्यांना याचे खूप आश्चर्य वाटले कारण ख्रिस हा खूप लोकप्रिय आणि मोठा अभिनेता आहे. अहवालानुसार, मे २०२२ पर्यंत, ख्रिस एव्हन्सची एकूण संपत्ती सुमारे ८० मिलियन डॉलर म्हणजे सुमारे ६२५ कोटी रुपये आहे. अशा परिस्थितीत, त्याने एवढा जुना स्मार्टफोन वापरणे चाहत्यांना आश्चर्यचकित करत आहे. ख्रिस म्हणतो की त्याच्या फोनमध्ये कोणतीही समस्या नव्हती, त्यामुळे त्याने फोन बदलला नाही.

ख्रिस एव्हन्सने नुकतेच इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला आहे, ज्यामध्ये तो त्याचा फोन डेटा आयफोन ६एस वरून आयफोन १३ मध्ये ट्रान्सफर करत आहे. ख्रिसने या पोस्टवर लिहिलेले कॅप्शन चाहत्यांना खूप आवडले आहे. ‘RIP iPhone 6s’ ने सुरुवात करून ख्रिस त्याच्या जुन्या आयफोनला म्हणतो, ‘आपण एकत्र खूप छान वेळ घालवला आहे. मला तुझ्या होम बटणाची आठवण येईल, पण चार्जिंगसाठी तुझ्यासोबत केलेली लढाई मी कधीच आठवणार नाही.’

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Captain america which owns rs 625 crore was using this old phone you too will be shock after knowing the reason pvp

Next Story
‘काय झाडी, काय डोंगार, काय हाटील…’ ट्रेंडींग ओळींवर ‘या’ पठ्ठ्याने बनवलं गाणं; Video Viral
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी