मुलाचं वजन जास्त असल्याने एका बापाने अत्यंत दृष्कृत्य केलं आहे. मुलाचं वजन कमी करण्याकरता अवघ्या सहा वर्षाच्या मुलाला ट्रेडमिलवर धावण्यास भाग पाडले. परिणामी या मुलाचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी संबंधित वडिलांवर हत्येचा गुन्हा दाखल झाला आहे. न्यू जर्सीमध्ये हा प्रकार घडला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

न्यू जर्सीत राहणारे क्रिस्टोफर ग्रेर (३१) यांनी त्यांचा मुलगा कोरी मिचिओलोला जबरदस्ती ट्रेडमिलवर धावायला भाग पाडले. अटलांटिक हाइट्स क्लबहाऊस फिटनेस सेंटरमध्ये हा प्रकार घडला. सीसीटीव्ही फुटेजमध्ये हा प्रकार कैद झाला असून न्यायालयातही हा व्हीडिओ सादर करण्यात आला होता. २० मार्च २०२१ रोजी ग्रेगर आणि कोरी अटलांटिक हाइट्स क्लबहाऊस फिटनेस सेंटरमध्ये प्रवेश करताना व्हीडिओमध्ये दिसत आहेत. व्हीडिओमध्ये ग्रेगर कोरीला ट्रेडमिलवर जबरदस्तीने चढवताना दिसतोय. तर मुलगा दमलेला असतानाही त्याला पुन्हा ट्रेडमिलवर चढवून मशिनची सेटिंग बदलतानाही व्हीडिओमध्ये दिसत आहे.

कोरीचं वजन जास्त आहे, त्यामुळे त्याचं वजन कमी करण्याकरता त्याला ट्रेडमिलवर धावायला लावले आहे. हे व्हीडिओ न्यायालयात सादर केल्यानंतर कोरीची आई ब्रे मिचिलिओ यांनाही अश्रू अनावर झाले होते. दरम्यान, कोरीच्या वडिलांवरील गुन्हा दाखल झाला तर त्यांना जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते.

हेही वाचा >> VIDEO: अंधश्रद्धेचा कळस! सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू, जिवंत होईल या आशेने दोरीला बांधून गंगा नदीत लटकवलं अन् नंतर…

वैद्यकीय उपचार ठरले अयशस्वी

यूएस सनने दिलेल्या वृत्तानुसार,कोरीला जखमही झाली होती. त्यामुळे कोरीला डॉक्टरांकडे घेऊन जाण्याची विनंती त्याच्या आईने केली होती. डॉक्टरांकडे गेल्यानंतर कोरीने डॉक्टरांना सांगितलं की वजन जास्त असल्याने वडिलांनी त्याला ट्रेडमिलवर धावायला सांगितले. ट्रेडमिलवर अधिकवेळ धावल्याने त्याला दुसऱ्यादिवशी अडखळणे, अस्पष्ट बोलणे, मळमळ आणि धाप लागण्यासारखी लक्षणे जाणवत होती. त्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याला तत्काळ वैद्यकीय उपचारांची गरज असल्याचं दिसताच डॉक्टरांनी त्वरीत उपचार सुरू होते. परंतु, हे उपचार अपयशी ठरले. सुरुवातीच्या शवविच्छेदनात आढळून आले की कोरीचा मृत्यू हृदय व यकृताच्या दुखापतींमुळे झाला.

मुलाच्या मृत्यूप्रकरणी आरोपीला ९ मार्च २०२२ रोजी अटक करण्यात आली होती. त्याला ओशन सिटी जेलमध्ये बॉण्डशिवाय ठेवण्यात आले आहे. तर, सध्या या प्रकरणी न्यायालयात सुनावणी प्रलंबित आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Disturbing video shows us man forcing 6 year old son to run on treadmill because he was too fat sgk
Show comments