लग्नात नववधूला हार घालतानाच घसरला नवरदेवाचा पायजमा आणि…; बघा मजेशीर video

या व्हिडीओला सोशल मीडियावर आत्तापर्यंत १६ हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

Jaimala Ceremony funny video
व्हायरल व्हिडीओ (फोटो: bhutni_ke_memes /Instragam)

Viral Video: सध्या लग्नसराईचा सीझन सुरू आहे, त्यामुळे अनेक लग्नसमारंभातील खास क्षण व्हायरल होत असतात. ज्यामुळे सोशल मीडियावरील यूजर्सच्या (social media) चेहऱ्यावर हसू येते. नुकताच असाच एका लग्नाचा व्हिडीओ (marriage video )समोर आला आहे, जो पाहून कुणीही हसेल. सहसा विवाहसोहळ्यांमध्ये वधू-वर स्वतःसाठी विशेष तयारी करतात. ज्या दरम्यान ते खूप महागडा आणि चांगला ड्रेस परिधान केलेला दिसतात. पण कधी कधी हा ड्रेस त्यांना फसवतो. नुकतेच एका वरासोबत असेच घडले आणि त्याचा लोकांसमोर हशा झाला. ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे.

सध्या व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये स्टेजवर वधू आणि नवरदेव एकमेकांना जयमाळा घालत असतात त्याच वेळी नवरदेवाच्या पायजमाची नाडी सुटते आणि त्याची पायजमा खाली सरकतो. वराचा पायजमाखाली जाताच वधू त्याला पाहते आणि तो हसतो. यावर तिथे उपस्थित असलेले सर्वजण वरावर हसायला लागतात.

(हे ही वाचा: प्रेरणादायी! ५ कंपन्यांमधील डिलिव्हरी बॉय ते सॉफ्टवेअर इंजिनीअर… घरोघरी ऑर्डर पोहोचवतानाच शिकला कोडिंग)

(हे ही वाचा: तीन भुकेलेले सिंह आणि एक मगर, कोण जिंकणार या लढाईत? बघा या Viral Video मध्ये)

नेटीझन्सच्या प्रतिक्रिया

व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ bhutni_ke_memes नावाच्या इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्याला वृत्त लिहिपर्यंत १६ हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. वापरकर्ते सतत या व्हिडीओवर मजेदार प्रतिक्रिया कमेंट करताना दिसतात.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Groom trousers slip in the middle of jaimala ceremony funny video goes viral on social media ttg

Next Story
तीन भुकेलेले सिंह आणि एक मगर, कोण जिंकणार या लढाईत? बघा या Viral Video मध्ये
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी