Viral Video : ‘स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी’ हे वाक्य तुम्ही अनेकदा ऐकले असेल. आईचे महत्त्व प्रत्येकाच्या आयुष्यात अनन्यसाधारण आहे. आईशिवाय आपण आपल्या आयुष्याची कल्पना करू शकत नाही. आपल्याला जन्म देण्यापासून ते संपूर्ण आयुष्यभर आई लेकरासाठी झटत असते. मुलाच्या सुखासाठी व आनंदासाठी नेहमी प्रयत्न करते. अशा आईविषयी जितके बोलावे किंवा कौतुक करावे तितके कमी आहे. सोशल मीडियावर आईवर आधारित व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ इतके भावुक करणारे असतात की पाहून डोळ्यात पाणी येते. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक आजोबा आपल्या आयुष्यातील आईची महती सांगताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून कोणालाही आईची आठवण येईल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ज्याला आई आहे त्याला सर्व दुनिया आहे, ज्याला आई नाही तर त्याला काही नाही.

या व्हायरल व्हिडीओमध्ये एक तरुण एका आजोबांशी संवाद साधताना दिसत आहे. तरुण आजोबांना विचारतो,आयुष्यात आई मोठी की बाप मोठा?” त्यावर आजोबा उत्तर देतात. “आई मोठी. सगळ्यात जर बघितलं तर बाप हा मिळू शकतो पण नऊ महिने आणि नऊ दिवस आईच्या कुशीत राहून जन्म घेतला आणि ही सर्व दुनिया बघितली. सर्वात श्रेष्ठ कोण आई. देव सुद्धा बेकार आहे. देवाला मी मानत नाही. ज्याला आई आहे त्याला सर्व दुनिया आहे, ज्याला आई नाही तर त्याला काही नाही.” हे उत्तर ऐकून कोणीही थक्क होईल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

पाहा व्हायरल व्हिडीओ (Watch Viral Video)

sudhir0216 या इन्स्टाग्राम अकाउंट वरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “स्वागत अकॅडमी स्कूल विरार पूर्व येतील स्कूल चे गेट कीपर पैलवान भानुदास बंडगर आमचे वस्ताद यांच्या कडून आईसाठी ऐकलेले दोन शब्द” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “एक करोड खरं बोलले आई शिवाय या जगात काय” तर एका युजरने लिहिलेय, “आई हृदय आहे तर बाप धकधक आहे” आणखी एका युजरने लिहिलेय, “स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी…. आई” एक युजर लिहितो, “लाख मोलाच बोलात बाबा तुम्ही” तर एक युजर लिहितो, “आई नाही त्याला काही..काळजात भिडणारा शब्द” अनेक युजर्सनी आईविषयीच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Is mother great or father old man answered so gracefully watch video importance of mother in my life ndj