video : समोरच्या झाडावर मोठी झेप घेऊन बिबट्याने माकडावर मारला पंजा, शिकारीचा थरार कॅमेरात कैद

माकडाची शिकार करण्यासाठी बिबट्याने रचला सापळा, थक्का करणारा व्हिडीओ पाहिलात का?

leopard Attack Viral Video On Twitter
बिबट्याचा थरारक व्हिडीओ झाला व्हायरल. (Image-Twitter)

leopard Attack Monkey Viral Video : जंगलात अनेक प्रकारचे हिंस्र प्राणी मुक्त संचार करीत असतात. वाघ, सिंह, बिबट्यासारखे प्राणी शिकारीच्या शोधात रानावनात भटकत असतात. बिबट्यासारखा चपळ आणि घातक प्राणी छोट्या मोठ्या प्राण्यांची पळवून पळवून दमछाक करतो. माकडांना पकडणं इतकं सोपं नसतं पण एका बिबट्याने कमालच केलीय. एका झाडावरून दुसऱ्या झाडावर मोठी झेप घेत माकडाची शिकार केलीय. बिबट्याला माकडाची शिकार करताना पहिल्या प्रयत्नात अपयश आले. पण बिबट्याने हार मानली नाही. माकड दुसऱ्या झाडावर जाताच बिबट्यानेही त्याच्यापाठोपाठ उडी घेत त्याला पंजात अडकवलं. बिबट्याच्या आणि माकडाचा झाडावर असलेला संपूर्ण थरार कॅमेरात कैद झाला असून व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
Skip
तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
7 व्या लेखांपैकी हा 3 वा लेख आहे ज्यापूर्वी तुम्हाला नोंदणी करावी लागेल
आमच्या विनामूल्य लेखांमध्ये अमर्यादित प्रवेशासाठी, कृपया साइटवर लॉग इन करा
Skip

पहिल्या प्रयत्नात अपयश आलं पण बिबट्यानेही हार मानली नाही अन्…

बिबट्याच्या व्हायरल झालेल्या या व्हिडीओनं अनेकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांना आश्चर्याचा धक्काच बसला आहे. एका झाडाच्या उंच फांदीवर काही माकडं बसलेली असतात. या माकडांना पाहिल्यावर बिबट्या त्या झाडावर जातो. झाडावर उडी मारत असताना बिबट्या खाली पडतो. शिकार करण्यासाठी बिबट्याने केलेल्या पहिला प्रयत्नाला यश मिळत नाही. हा संपूर्ण थरार व्हायरल झालेल्या या व्हिडीओत पाहायला मिळत आहे.

नक्की वाचा – Video : बर्फाळ डोंगरात मादी अस्वलाने पिल्लाला दिली मायेची उब, ‘तो’ क्षण लाखो नेटकऱ्यांची मनं जिंकतोय

इथे पाहा व्हिडीओ

बिबट्याला पहिल्या प्रयत्नात माकडाची शिकार करता आली नाही, पण बिबट्या मात्र हार मानत नाही. माकडांना दुसऱ्या झाडावर जाताना पाहून बिबट्या थेट मोठी झेप घेतो आणि एका माकडावर पंजा मारतो. त्यानंतर बिबट्या माकडाची शिकार करतो. हा व्हिडीओ नरेंद्र सिंह नावाच्या युजरने ट्विटरवर शेअर केला आहे. या व्हिडीओ कॅप्शन देत म्हटलं आहे की, प्रयत्न करणाऱ्यांची कधीच हार होत नाही. पहिल्या प्रयत्नात अपयश मिळाल्यानंतर बिबट्याने झाडावर पुन्हा एकदा मोठी झेप घेतली आणि माकडाची शिकार केली. हा व्हिडीओ सोशल मीडियाच्या अनेक प्लॅटफॉर्मवर वेगानं व्हायरल होत आहे. अपयश मिळाल्यानंतर हार मानणाऱ्या लोकांनी यश मिळवण्यासाठी पुन्हा लढत राहायचं, असाच मेसेज एकप्रकारे या व्हिडीओच्या माध्यमातून देण्यात आला आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 22-01-2023 at 22:07 IST
Next Story
Video : बर्फाळ डोंगरात मादी अस्वलाने पिल्लाला दिली मायेची उब, ‘तो’ क्षण लाखो नेटकऱ्यांची मनं जिंकतोय
Exit mobile version