नेपाळच्या उडत्या बसचा Video होतोय व्हायरल; भयंकर खोल दरीवरून जीवघेणा प्रवास पाहिलात का?

Bus Flying On Ropeway: बस ज्या दोन डोंगरांमध्ये हवेतून प्रवास करते तिथे खाली असणारी दरी फार खोल आहे. यापूर्वी इथे एक रस्ता होता पण दरी कोसळल्यावर पर्याय म्हणून अशा उडत्या बस

Video Nepal Flying Bus Over Dangerous Deep Valley Terrifying Travel Clip Goes Viral On Internet
नेपाळच्या उडत्या बसचा Video होतोय व्हायरल (फोटो: ट्विटर)

Bus Flying On Ropeway: २०२२ मध्ये नितीन गडकरी यांनी उडत्या बसची घोषणा केली होती. पण आता नेपाळमध्ये हे तंत्रज्ञान अगोदरच वापरात आल्याचे दिसत आहे. अलीकडेच सोशल मीडियावर नेपाळमधील एक भन्नाट जुगाड व्हायरल झाला आहे. यामध्ये चक्क एक बस प्रवाशांना घेऊन हवेत उडत आहे. एका डोंगरावरून दुसऱ्या बाजूला जाण्यासाठी जाड केबल्सच्या मदतीने एक रोप वे तयार करण्यात आला आहे ज्यावर चक्क एक बस उडताना दिसत आहे. अलीकडेच नेपाळमध्ये विमान दुर्घटनेमध्ये अनेकांनी जीव गमावले होते आणि त्यानंतर आता या उडत्या बसमधून पुन्हा एकदा लोकांचा जीव धोक्यात घालणारा स्टंट रोज केला जात आहे.

तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
Skip
तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
7 व्या लेखांपैकी हा 3 वा लेख आहे ज्यापूर्वी तुम्हाला नोंदणी करावी लागेल
आमच्या विनामूल्य लेखांमध्ये अमर्यादित प्रवेशासाठी, कृपया साइटवर लॉग इन करा
Skip

एका ट्विटर युजरने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये कॅप्शनमधून या वाहतुकीच्या साधनाची माहिती दिली आहे. नेपाळ मध्ये सार्वजनिक वाहतूक अशीच होते असे कॅप्शन मध्ये लिहिलेले आहे. आपण पाहू शकता की एका जाड केबल व रश्शीच्या मदतीने बस दोन डोंगरांमधील दरी पार करते. दोन लोक बसच्या मागे उभे राहून ती नीट दरी पार करते का हे पाहण्यासाठी थांबले आहेत.

उडत्या बसचा Video झाला Viral

हे ही वाचा<< Video: भल्यामोठ्या मगरीला पायावर उचलून ‘तो’ भरवत होता जेवण; आधी ती शांत जेवली आणि मग..

मीडिया रिपोर्ट्सनुसार, बस ज्या दोन डोंगरांमध्ये हवेतून प्रवास करते तिथे खाली असणारी दरी फार खोल आहे. यापूर्वी इथे एक रस्ता होता पण दरी कोसळल्यावर पर्याय म्हणून अशा उडत्या बसचा मार्ग स्वीकारण्यात आला. एका अहवालानुसार, नेपाळमध्ये अनेकदा भूस्खलन होत असल्याने अनेक रस्ते बंद होत असतात अशावेळी हे असे जुगाड लोकांच्या कामी येतात पण खरंतर कितीही हुशारीने बनवलेले असले तरी हे जुगाड जीवघेणे सुद्धा ठरू शकतात.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 22-01-2023 at 11:49 IST
Next Story
शाळेतून परतणाऱ्या वृद्ध शिक्षकाला महिला पोलिसांकडून काठ्यांनी मारहाण, संतापजनक घटनेचा Video व्हायरल
Exit mobile version