Viral Video : टोल प्लाझा हे नेहमीच हाणामारीसारख्या वेगवेगळ्या घटनांमुळे चर्चेत असतात, पुन्हा एकदा टोल प्लाझावर एका महिलेने टोल कर्मचार्‍याला मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ही घटना उत्तर प्रदेशच्या हापूर येथील छिजरसी टोल प्लाजा येथे घडली. या व्हिडीओमध्ये एक महिला एका टोल कर्मचार्‍याला मारहाण करताना दिसत आहे, ही महिला त्या कर्मचाऱ्याला अवघ्या चार सेकंदांमध्ये सात वेळा चापट मारताना दिसत आहे. तर या घटनेत टोल कर्मचारी पूर्णपणे गोंधळल्याचे पाहायला मिळत आहे.

व्हिडीओमध्ये काय आहे?

दरम्यान या घटनेच्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये संबंधित महिला तिच्या फास्टॅगमध्ये पुरेसे बॅलेन्स नसल्याने झालेल्या वादानंतर टोल प्लाझाच्या बूथमध्ये घुसून कर्मचार्‍याला मारताना दिसत आहे. टोल कर्मचाऱ्याने महिलेला पैसे देण्यास सांगितल्यानंतरती बूथमध्ये घुसली आणि त्याला अनेक वेळा थप्पड लगावल्या.

नेमकं काय झालं होतं?

घटनास्थळावर उपस्थित असलेल्यांनी दिलेल्या माहितीनुसार महिला ही गाजियाबाद येथून येत होती आणि टोल भरण्याएवजी तीन टोल कर्मचार्‍याला मारहाण केली. दरम्यान हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर याबद्दल संताप व्यक्त केला जात आहे. लोक सोशल मीडियावर वेगवेगळ्या कमेंट करत आहेत. ज्यामध्ये काही जणांनी या घटनेबद्दल संताप व्यक्त केला आहे, तर काहींनी महिलेविरोधात कारवाई करण्याती मागणी केली आहे.

एका वापरकर्त्याने ‘४ सेकंदात ७ थप्पड? अ‍ॅक्शन चित्रपटही इतक्या वेगाने पुढे जात नाहीत!’ अशी कमेंट केली आहे. तर दुसऱ्या एका वापरकर्त्याने ‘ही टोल पेमेंटची नवीन पद्धत आहे का?’ असा खोचक प्रश्न कमेंटमध्ये विचारला आहे. ‘फक्त ती एक महिला आहे म्हणून, याचा अर्थ ती काहीही करू शकते का? हे खूप अति झालं!’ अशी कमेंट तिसऱ्या वापकर्त्याने केली आहे.

व्हायरल व्हिडिओ पाहूण महिलेविरोधात कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. अनेकांनी सोशल मीडियावर उत्तर प्रदेश पोलिसांना या व्हिडीओबद्दल टॅग केले आहे आणि टोल कर्मचाऱ्यावर हल्ला करणाऱ्या महिलेविरुद्ध कठोर कारवाईची मागणी केली आहे.