जागतिक आर्थिक मंदी, रेडी रेकनेरचे वाढलेले दर, या सर्व पाश्र्वभूमीवर नवी मुंबई बिल्डर असोशिएशनच्या वतीने पामबीच मार्गावर सानपाडा येथे १३ वे मालमत्ता प्रदर्शन शुक्रवार ११ जानेवारी पासून चार दिवस आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शन काळात ५०० कोटी रुपयांपर्यंत तर त्यानंतरच्या तीन महिन्यात तीन हजार कोटी रुपयापर्यंत घरांसाठी गुंतवणूक होईल असा आशावाद असोशिएनचे अध्यक्ष एम. सी. सनी यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला आहे.
नवी मुंबईतील मालमत्ता प्रदर्शन हे राज्यातील एक उत्तम आणि नियोजनबद्ध प्रदर्शन मानले जाते.  या प्रदर्शनाच्या चार दिवस काळात राज्यातील कानाकोपऱ्यातून सुमारे दीड लाख ग्राहक भेटी देत असतात. सर्वसामान्यांपासून ते गर्भश्रीमंताना परवडतील अशी घरे या प्रदर्शनात विक्रासाठी ठेवली जातात. या वर्षी नवी मुंबई, पनवेल, उरण, कर्जत, खालापूर, खोपोली, या तालुक्यातील बिल्डराबरोबरच नाशिक, पुणे येथील बिल्डरांनी या प्रदर्शनात भाग घेतला असल्याची माहिती असोशिएशनचे सचिव देवांग त्रिवेदी यांनी पत्रकार परिषदेत दिली. या पर्दर्शनात १५ लाखापासून दोन कोटी पर्यंतच्या किमतीची घरे उपलब्ध राहणार         आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: New mumbai builders assocations estate exhibition between 11 to 14 january