२०२२ मारुती सुझुकी बलेनो नवीन अवतारात होणार लॉंच! जाणून घ्या हाय-टेक फीचर्सबद्दल

नवीन फीचर्स आणि तंत्रज्ञान बलेनोमध्ये उपलब्ध होणार आहे. किमती फेब्रुवारीच्या सुरुवातीला जाहीर केल्या जाऊ शकतात.

2022-Maruti-Suzuki-Baleno
२०२२ मारुती सुझुकी बलेनो (फोटो: financial express )

मारुती सुझुकीने त्यांच्या गुजरात प्लांटमध्ये मोठ्या बदलांसह आगामी २०२२ बलेनोचे उत्पादन सुरू केले आहे. कंपनीने या प्रोडक्शन प्लांटमधून २४ जानेवारीला पहिले मॉडेल आणले आहे आणि या कारच्या किमती फेब्रुवारीच्या सुरुवातीला जाहीर केल्या जाऊ शकतात. डिझाईनमधील बदलांव्यतिरिक्त, सर्व नवीन फीचर्स आणि नवीन तंत्रज्ञान बलेनोमध्ये उपलब्ध होणार आहे. कारमध्ये मोठ्या बदलांसह, बलेनो ह्युंदाई i20 च्या तुलनेत खूप पुढे जाईल. ही कार मारुती सुझुकीची सर्वाधिक विकली जाणारी प्रीमियम हॅचबॅक आहे आणि नवीन मॉडेलसह, या विक्रीत मोठी वाढ होणे जवळपास निश्चित आहे.

कारचे डिझाइन

नवीन मारुती सुझुकी बलेनोचा चेहरा वक्र ऐवजी पुढच्या बाजूने सपाट असणार आहे. यामध्ये, नवीन ग्रिलमध्ये हेडलॅम्प आणि दुसर्‍या डिझाईनचे एलईडी डीआरएल असणार आहेत. कारचे बॉनेट ग्रिलशी जुळणारे दुसरे डिझाइन देखील असू शकते. याशिवाय, मागील बाजूस मोठे बदल देखील दिसणार आहेत ज्यात नवीन बंपर, पुन्हा डिझाइन केलेले टेलगेट, बूटलिडपर्यंत विस्तारित टेललाइट यांचा समावेश असेल. नवीन कारसोबत नवीन डिझाईनचे अलॉय व्हील मिळणार आहेत, जे बलेनोच्या महागड्या व्हेरियंटमध्ये उपलब्ध असतील.

(हे ही वाचा: Mahindra Scorpio 2022 नव्या रुपातच नाही तर नवीन नावासह होणार लॉंच!)

९ इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम!

बाह्य बदलांव्यतिरिक्त, कंपनी नवीन बलेनो फेसलिफ्टच्या केबिनमध्ये देखील मोठे बदल करणार आहे. येथे विद्यमान स्मार्टप्ले स्टुडिओ प्रणालीऐवजी, कंपनी मोठ्या आकाराची नवीन टचस्क्रीन इन्फोटेनमेंट प्रणाली देऊ शकते. असा अंदाज आहे की जागतिक बाजारात विकल्या गेलेल्या नवीन Suzuki S-Cross पासून ते ९ इंच टचस्क्रीन कंपनी नवीन बलेनोला देणार आहे. या फीचर्सव्यतिरिक्त, मारुती सुझुकी नवीन कारमध्ये एम्बेडेड सिम प्रदान करू शकते, ज्याद्वारे कनेक्टेड कार फिचर म्हणजे इंटरनेट-ऑपरेटेड फिचर शोधली जाऊ शकतात.

(हे ही वाचा: हिरो XPulse 200 4 Valve अॅडवेंचर बाईकच्या दुसऱ्या बॅचची बुकिंग सुरू!)

(फोटो: Indian express )

कनेक्टेड कार फीचर्स?

या नवीन फीचर्ससह, वायरलेस स्मार्टफोन इंटिग्रेशन देखील मारुती सुझुकी बलेनोमध्ये असू शकते. नवीन इन्फोटेनमेंट आणि कनेक्टेड कार फीचर्सनंतर, ऑटो एलईडी हेडलॅम्प, कीलेस एंट्री, ऑटो क्लायमेट कंट्रोल आणि क्रूझ कंट्रोल यासारख्या अनेक फीचर्स नवीन बलेनो फेसलिफ्टमध्ये मिळू शकतात.

(हे ही वाचा: Mahindra Scorpio 2022 नव्या रुपातच नाही तर नवीन नावासह होणार लॉंच!)

(फोटो: Indian express )

(हे ही वाचा: Toyota Hilux चे भारतात झाले अनावरण; या लाइफस्टाइल पिकअप ट्रकचे भारतात बुकिंग सुरू!)

इंजिनबद्दल बोलायचे झाले तर, कंपनी त्यात कोणताही बदल करणार नाही अशी शक्यता आहे. सध्याचे १.२ लीटर पेट्रोल इंजिन कारमध्ये आढळू शकते जे ८३ हॉर्सपॉवर आणि ९० हॉर्सपॉवर सौम्य-हायब्रीडमध्ये बनवते. या इंजिनसह, ५ स्पीड मॅन्युअल आणि CVT गिअरबॉक्सचे पर्याय पूर्वीप्रमाणेच उपलब्ध असतील.

मराठीतील सर्व ऑटो ( Auto ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: 2022 maruti suzuki baleno to launch in new incarnation know about high tech features ttg

Next Story
TVS Ntorq 125 vs Yamaha Ray ZR 125: मायलेज आणि किमतीत कोणती स्कूटर वरचढ, जाणून घ्या
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी