Honda Activa Electric Scooter: दिग्गज दुचाकी कंपनी होंडा बाजारात आणखी एक मोठा धमाका करणार आहे. अशी माहिती आहे की, कंपनी आपली सर्वात लोकप्रिय स्कूटर Honda Activa चा इलेक्ट्रिक अवतार आणणार आहे. या स्कूटरबद्दल २९ मार्च २०२३ रोजी घोषणा केली जाऊ शकते. वास्तविक, कंपनीने २९ मार्चशी संबंधित मीडिया आमंत्रण पाठवले आहे. त्यानुसार, कंपनी या दिवशी इलेक्ट्रिक टू-व्हीलरसाठी आपली योजना जाहीर करेल. २०२४ मध्ये ही स्कूटर लाँच करण्यात येईल, अशी माहिती आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नवीन इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये अ‍ॅक्टिव्हा नेमप्लेट वापरता येणार आहे. यामुळे कंपनीला लोकप्रिय नावाच्या माध्यमातून लोकांशी जोडण्यास मदत होईल. तसेच, होंडाला इलेक्ट्रिक स्कूटरच्या मार्केटिंगसाठी अतिरिक्त खर्च करावा लागणार नाही. जपानी दुचाकी निर्माता कंपनी २०२५ पर्यंत जागतिक स्तरावर दोन इलेक्ट्रिक स्कूटर सादर करणार आहे. अ‍ॅक्टिव्हा ई-स्कूटर ही त्यापैकी एक असेल.

(हे ही वाचा: नवे फीचर्स, टेक्नॉलॉजीवाल्या ‘या’ बाईकची Hero, Honda वर मात, किंमत ७० हजारांपेक्षाही कमी, मायलेज ७० किमी)

भारतासाठी नवीन इलेक्ट्रिक स्कूटर होंडा जपानच्या सहकार्याने विकसित करण्यात आली आहे. खरेतर, Honda Motorcycle and Scooter India (HMSI) चे MD आणि CEO Atsushi Ogata यांनी पुष्टी केली की, पुढील आर्थिक वर्षाच्या अखेरीस पहिले इलेक्ट्रिक वाहन तयार होईल.

नवीन Honda Activa इलेक्ट्रिक स्कूटरला फ्लोअरबोर्डच्या खाली एक निश्चित बॅटरी पॅक आणि मागील चाकावर हब मोटर मिळेल. Honda बॅटरी स्वॅपिंग नेटवर्कसह काढता येण्याजोग्या बॅटरीवर देखील काम करत आहे. तथापि, हा सेटअप अ‍ॅक्टिव्हा ई-स्कूटरमध्ये नसून भविष्यातील वाहनांमध्ये सादर केला जाण्याची शक्यता आहे. एकूण लूकच्या बाबतीत होंडा अ‍ॅक्टिव्हा इलेक्ट्रिक स्कूटर पेट्रोल स्कूटरसारखीच असेल अशी अपेक्षा आहे. EV लुक देण्यासाठी कंपनी डिझाइनमध्ये काही बदल करणार आहे.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Honda likely to reveal details about first electric scooter honda activa on march 29 pdb
First published on: 22-03-2023 at 17:27 IST