If you are using the cars of these two companies be careful Otherwise theft may also occur | Loksatta

तुम्ही ‘या’ दोन कंपन्यांच्या गाड्या वापरत असाल, तर वेळीच व्हा सावध; नाहीतर सहपणे होऊ शकते चोरी

विविध कंपन्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण फीचर्स असलेल्या कार भारतीय बाजारात उपलब्ध आहेत. नवीन कार खरेदी करताना ग्राहक सुरक्षेसह अनेक गोष्टी विचारात घेतात. गेल्या काही वर्षांत भारतात कार चोरीच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे.

तुम्ही ‘या’ दोन कंपन्यांच्या गाड्या वापरत असाल, तर वेळीच व्हा सावध; नाहीतर सहपणे होऊ शकते चोरी
पार्किंगमधून कार, बाइक चोरीला गेल्यास काय कराल? (Photo – pixabay)

भारतात वाहनांची सुरक्षा हेच सध्याचं सर्वात मोठं आव्हान आपल्यासमोर आहे. भारतीय बाजारपेठेत ह्युंदाई आणि किया कारला मोठी मागणी आहे.   दक्षिण कोरियाच्या दोन्ही ऑटो कंपन्यांनी देशातील कार बाजारात आपली चांगली पकड बनवली आहे. ह्युंदाई क्रेटा आणि किया सेलटॉस मॉडेल्स भारतात कमी कालावधीत खूप लोकप्रिय झाली आहेत. मात्र, नुकत्याच आलेल्या एका अहवालात दोन्ही कंपन्यांच्या कारच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.

इन्शुरन्स इन्स्टिट्यूट फॉर हायवे सेफ्टी (IIIHS) या अहवालानुसार, ह्युंदाई आणि कियाच्या कार चोरी करण्यासाठी सर्वात सोप्या असल्याचे समोर आले आहे. नुकत्याच समोर आलेल्या एका व्हायरल व्हिडीओमध्‍ये चोरांनी किया आणि ह्युंदाईच्‍या गाड्या कशा चोरल्‍या हे देखील दिसले आहे. HT Auto च्या म्हणण्यानुसार, या व्हिडिओंमध्ये चोर ह्युंदाई आणि किया वाहनांचे इग्निशन कव्हर काढताना दिसत आहेत, त्यानंतर कार सुरू करण्यासाठी स्क्रू ड्रायव्हर किंवा USB केबल वापरताना दिसत आहेत. जाणून घेऊया या कारचे चोरीचे कारण नेमके काय आहे.

आणखी वाचा : टाटाच्या ‘या’ ईव्हीमध्ये मिळणार हे भन्नाट फिचर, ब्रेक मारताच चार्ज होईल कार, जाणून घ्या..

ह्युंदाई आणि किया कारच्या चोरीमागील सर्वात मोठे कारण म्हणजे कारमध्ये इमोबिलायझर नसणे हा आहे.  IIIHS च्या संशोधनानुसार, २०१५ ते २०१९ दरम्यान बनवलेल्या या दोन्हीं कारच्या कार मॉडेल्समध्ये इलेक्ट्रॉनिक इमोबिलायझर नाही, असे उघड झाले आहे.

२०१५ मध्ये, इतर कार कंपन्यांच्या ९६ टक्के कारमध्ये इमोबिलायझर मानक होते. तर ह्युंदाई आणि कियाच्या बाबतीत फक्त २६ टक्के गाड्यांना इमोबिलायझर देण्यात आले होते. मात्र, दोन्ही कार कंपन्यांनी त्यांच्या कारमध्ये इमोबिलायझर न वापरण्याचे कारण दिलेले नाही.

२०२२ मॉडेल सादर केल्यानंतर, कियाने आपल्या वाहनांमध्ये इमोबिलायझर्स प्रदान करण्यास सुरुवात केली आहे. दुसरीकडे, ह्युंदाईचे म्हणणे आहे की, १ नोव्हेंबर २०२१ नंतर उत्पादित सर्व वाहनांनी मानक म्हणून इमोबिलायझर वापरण्यास सुरुवात केली आहे. मात्र, यातील सत्यता काय हे अजुन उघड झालेले नाही.

मराठीतील सर्व ऑटो ( Auto ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
Petrol-Diesel Price on 26 September 2022: पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये अंशतः घसरण; जाणून घ्या, आजची किंमत

संबंधित बातम्या

मारुती सुझुकीची ‘ही’ नवीन SUV फक्त ४० हजार रुपयांमध्ये आणा घरी; लवकर घ्या संधीचा लाभ!
फोनपेक्षा कमी किंमतीत खरेदी करा 83kmpl मायलेजवाली ही बाईक; वाचा काय आहे ऑफर
खुशखबर! ७० हजारांची ‘ही’ स्कूटर फक्त १५ हजारात होईल तुमची; जाणून घ्या कुठे मिळतेय ऑफर
जग्वार लँड रोव्हर कंपनीला ६७० मिलियन अमेरिकन डॉलर्सचं कर्ज देण्याचा निर्णय; कारण…
नोव्हेंबर महिन्यात वाहनांची रेकॉर्डब्रेक विक्री; ‘ही’ कार कंपनी ठरली देशात अव्वल!

व्हिडिओ

ताज्या बातम्या
हुशार कुत्रा! जेवण मिळवण्यासाठी मित्राला कसा चकमा दिला एकदा पाहाच
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील विनोदवीराने दिली गुडन्यूज, बाळाचा व्हिडीओ केला शेअर
पुणे: सिंहगड रस्ता भागात मोबाइल चोरट्यांची टोळी गजाआड
पुणे: मार्केट यार्डातील घाऊक बाजारात मटार, फ्लाॅवर, कोबी, वांगी, मिरची स्वस्त
मुंबई: चंदनवाडी स्मशानभूमीतही लवकरच गॅस दाहिनी