Kolkata Rape and Murder : कोलकाता या ठिकाणी असलेल्या आर. जी. कर रुग्णालयात महिला डॉक्टरवर बलात्कार करुन तिची अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या ( Kolkata Rape and Murder ) करण्यात आली. ही घटना ९ ऑगस्टला घडली आणि या घटनेचे पडसाद देशभरात उमटले. माणुसकीला काळीमा फासणारं हे कृत्य करणारा नराधम संजय रॉय याला अटक करण्यात आली आहे. हे प्रकरण सीबीआयकडे वर्ग करण्यात आलं आहे. सीबीआयने कोर्टात या प्रकरणी महत्त्वाची माहिती दिली आहे.

नेमकी घटना काय घडली?

९ ऑगस्टला सकाळी एक महिला डॉक्टर आर. जी. कर वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातल्या ( R.G. Kar Hospital ) सेमिनार हॉलमध्ये मृतावस्थेत आढळली. तिचा मृतदेह अर्धनग्न अवस्थेत होता. तिच्या मृतदेहाचं शवविच्छेदन करण्यात आलं तेव्हा तिच्यावर बलात्कार झाला असल्याची बाब समोर आली. तिच्या शरीरावर आणि गुप्तांगावर अनेक जखमा ( Kolkata Rape and Murder ) होत्या. तिच्या डोळ्यांमधूनही रक्त वाहात होतं अशीही माहिती समोर आली. त्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या मुलीला न्याय दिला पाहिजे अशी मागणी होते आहे. अत्यंत क्रूर पद्धतीने तिची हत्या ( Kolkata Rape and Murder ) करण्यात आली. त्याआधी तिच्यावर पाशवी बलात्कार करण्यात आला. या प्रकरणात आरोपी संजय रॉयला पोलिसांनी अटक केली आहे.

सर्वोच्च न्यायालयाने घेतली दखल

कोलकाता येथील आर. जी. कार वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टरवर झालेला बलात्कार आणि त्यानंतर तिच्या निर्घृण हत्येच्या घटनेने देशभर खळबळ उडाली. १८ ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयाने स्वत:हून याप्रकरणाची दखल घेतली आणि २० ऑगस्ट पासून या प्रकरणाची सुनावणी सुरू केली. सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड आणि न्यायमूर्ती जे.बी. पार्डीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली.

हे पण वाचा- Badlapur School Case : “बदलापूरच्या घटनेनंतर बंद पुकारणारे कोलकाता प्रकरणावर गप्प का?” विखे पाटलांचा प्रश्न; म्हणाले, “ममतांच्या पदराखाली…”

डी. वाय चंद्रचूड काय म्हणाले?

पहिल्याच दिवशी सुनावणी घेत असताना सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी डॉक्टरांसाठी कामाच्या ठिकाणी सुरक्षिततेसाठी कार्यपद्धती तयार करण्यासाठी ९ सदस्यीय राष्ट्रीय कार्य दलाची स्थापना करण्याचे आदेश दिले. या कार्य दलात विविध पार्श्वभूमीचे डॉक्टर असतील जे संपूर्ण भारतामध्ये अनुसरण करण्याच्या पद्धती सुचवतील जेणेकरुन कामाच्या ठिकाणी सुरक्षिततेची परिस्थिती असेल आणि तरुण किंवा मध्यमवयीन डॉक्टर त्यांच्या कामाच्या वातावरणात सुरक्षित असतील असं चंद्रचूड म्हणाले. दरम्यान सीबीआयने या प्रकरणी कोर्टात महत्त्वाची माहिती दिली आहे.

कोलकातामधील घटनेत माजी प्राचार्यासह चार डॉक्टरांची होणार पॉलिग्राफ चाचणी, (फोटो-संग्रहित छायायाचित्र)

सीबीआयने कोर्टाला काय सांगितलं?

सीबीआयने कोलकाता डॉक्टर बलात्कार आणि हत्या प्रकरणाचा तपास हाती घेतला आहे. मात्र तपास करणं हे आमच्यासाठी मोठं आव्हान आहे. कारण ज्या ठिकाणी घटना घडली त्या ठिकाणी पुराव्यांशी छेडछाड करण्यात आली. ज्या ठिकाणी घटना घडली तिथले काही पुरावे तिथे नसल्याचं दिसतं आहे असं सीबीआयने सर्वोच्च न्यायालयाला सांगितलं.