महाराष्ट्रातील राजकीय हलचालींच्या सध्या केंद्रस्थानी असणाऱ्या गुवहाटीमधील हॉटेल ‘रेडिसन ब्लू’ने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे हे आमदारांसोबत वास्तव्यास असणाऱ्या या पंचातारांकित हॉटेलने आता मोठा निर्णय घेत ३० जूनपर्यंत सर्वसामान्य ग्राहकांसाठी सर्व बुकींग्स बंद केल्या आहेत. म्हणजेच या हॉटेलमध्ये ३० जूनपर्यंत रुम्स उपलब्ध होणार नाहीत. मुंबईपासून २७०० किलोमीटरवर असणाऱ्या या हॉटेलमधून सध्या महाराष्ट्रातील सत्ताधारी महाविकास आघाडीविरोधात शिंदेंनी बंडखोर आमदारांची आघाडी उघडली आहे. या हॉटेलच्या वेबसाइटवरुन ३० जूनपर्यंतची कोणतीही तारीख उपलब्ध नसल्याचं दाखवण्यात येत आहे.

नक्की वाचा >> एकनाथ शिंदेंचा थेट राज ठाकरेंना फोन; ‘या’ विषयावर दोन्ही नेत्यांमध्ये झाली चर्चा

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचं समजते. महाराष्ट्रामधील सरकारला आपला पाठिंबा नसल्याचं या हॉटेलमध्ये राहत असलेल्या आमदारांनी स्पष्ट केलं आहे. स्वपक्षाविरोधात बंड पुकारताना राज्यातील परिस्थिती आणि या किचकट प्रकरणावर कायदेशीर तसेच राजकीय मुसद्देगिरीच्या माध्यमातून तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरु असेपर्यंत आमदार याच हॉटेलमध्ये वास्तव्यास असणार आहेत. त्यामुळेच या आमदारांसाठीचं बुकींग हे ३० जूनपर्यंत वाढवण्यात आल्यानेच हॉटेलने इतर ग्राहकांसाठी बुकींग बंद केल्याचे समजते. या हॉटेलबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त आहे. स्थानिक काँग्रेस कार्यकर्त्यांनी या हॉटेल समोर निदर्शनंही केली आहेत.

नक्की वाचा >> ‘…असा आव आणू नका, याची किंमत भविष्यात भाजपाला चुकवावीच लागेल’; बंडखोर आमदारांना ‘नाच्या’ म्हणत शिवसेनेचा इशारा

विधान परिषदेच्या निवडणुकींचे निकाल लागल्यानंतर २१ जून रोजी एकनाथ शिंदे हे मोजक्या आमदारांसोबत सुरतला गेले. तिथून दुसऱ्याच दिवशी म्हणजे २२ जून रोजी त्यांनी आपला मुक्काम गुवहाटीमधील या हॉटेलमध्ये हलवला असून तेव्हापासूनच हे हॉटेल महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या केंद्रस्थानी आहे. २२ जूनपासून एक एक करत अनेक शिवसेना आमदार आणि नेते शिंदे गटात सहभागी झाल्यानंतर याच हॉटेलमध्ये वास्तव्यास आहेत. एकीकडे आसाममध्ये पुराने थैमान घातलेलं असतानाच दुसरीकडे शिवसेनेच्या बंडखोर आमदारांसाठी पंचातारांकित हॉटेलची सोय याच राज्याच्या राजधानीत करुन देण्यात आल्याची टीका या बंडखोरांना विरोध करणाऱ्यांकडून केली जात आहे.

नक्की पाहा >> Photos: केंद्रीय मंत्रिमंडळात मुलाला स्थान, RSS चा प्रभाव, खासदारकी अन्…; एकनाथ शिंदेंचं बंड पुत्रप्रेमातून असण्यामागील कारणं

गुवाहाटीतील रेडिसन ब्लू हॉटेलमध्ये शिंदेंसोबत शिवसेनेच्या आमदारांबरोबरच काही अपक्ष आमदारही आहेत. या ठिकाणी आजपर्यंत म्हणजेच २७ जूनपर्यंत एकूण ५१ आमदार वास्तव्यास आहेत. एनडीटीव्ही वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार रेडिसन ब्लू हॉटेलमध्ये शिवसेनेच्या आणि अपक्ष बंडखोर आमदारांसाठी ७० रुमचे बुकींग करण्यात आले आहे. आधी सात दिवसांसाठी रुमचे बुकींग करण्यात आले होते. ज्यामध्ये आता आणखीन काही दिवसांची भर पडली असून बुकींगचा कालावधी ३० जूनपर्यंत वाढवण्यात आलाय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या हॉटेलचे सात दिवसांचे भाडे ५६ लाख रुपये आहे. अर्थात आता मुक्कामाचे दिवस वाढल्यानंतर भाडंही वाढणार आहे. रेडिसन ब्लू हॉटेलमध्ये एका दिवसाचे जेवण आणि इतर सुविधांसाठी तब्बल ८ लाख रुपये मोजावे लागतात.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra political crisis eknath shinde issue radission blu guwahati closes new bookings till june 30 scsg
First published on: 27-06-2022 at 09:08 IST