टाटा ते टायटन ‘या’ मोठ्या शेयर्समध्ये आहे राकेश झुनझुनवाला यांची गुंतवणूक

झुनझुनवाला यांनी १९८० च्या दशकाच्या सुरुवातीस स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात केली होती.

टाटा ते टायटन ‘या’ मोठ्या शेयर्समध्ये आहे राकेश झुनझुनवाला यांची गुंतवणूक
संग्रहित

Rakesh Jhunjhunwala Investment : भारताचे ‘वॉरन बफे’ अशी ओळख असलेल्या राकेश झुनझुनवालांचे आज सकाळी निधन झाले. शेअर बाजारामध्ये पाच हजारांच्या गुंतवणुकीपासून सुरू केलेला प्रवास कोट्यावधींच्या घरात पोहोचवण्याची किमया साधणाऱ्या झुनझुनवाला यांचा प्रवास थक्क करणारा आहे. त्यांनी टाटापासून ते टायटन अशा अनेक मोठ्या शेयर्समध्ये त्यांनी गुंवणूक केली होती.

हेही वाचा – Rakesh Jhunjhunwala Death : एअरलाईन्सचे मालक ते चित्रपट निर्माते, जाणून घ्या कोट्यवधींचे साम्राज्य निर्माण करणाऱ्या ‘बिग बुल’चा प्रवास

झुनझुनवाला यांनी १९८० च्या दशकाच्या सुरुवातीस स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात केली होती. त्यांच्या रेयर इंटरप्राईसेज या कंपनीद्वारे त्यांनी पोर्टफोलिओ तयार केला होता. झुनझुनवाला हे तीन कंपन्यांमध्ये संचालक होते. यामध्ये रेयर इक्विटी प्रायव्हेट लिमीटेड, रेयर फॅमिली फाऊंडेशन आणि होप फिल्म मेकर या कंपनीचा समावेश आहे. तर याशिवाय इतर पाच कंपन्यांमध्येही त्यांनी भागीदारी होती.

हेही वाचा – “त्यांना काय बोलायचं होतं हे त्यांच्यासोबतच गेलं,” विनायक मेटेंच्या अपघाती निधनानंतर पंकजा मुंडेंनी व्यक्त केले दु:ख

फोर्ब्स मासिकानुसार, झुनझुनवाला यांची शेअर बाजारातील गुंतवणूक ५.८ अब्ज डॉलर्स (सुमारे ४६ हजार कोटी रुपये) आहे. झुनझुनवालांच्या काही मोठ्या गुंतवणुकींमध्ये टायटन कंपनीचा समावेश आहे. तसेच त्यांच्याकडे टाटा मोटर्समध्ये १.०९ टक्के हिस्सा आहे. तर त्यांच्या पत्नीच्या नावे क्रिसिलमध्ये ५.४८ टक्के आणि फेडरल बँकेत ३.६४ टक्के हिस्सा आहे. याशिवाय डिशमन कार्बोजेन एमसीस लि., डी. बी. रियल्टी लि., प्रोझोन इंटू प्रॉपर्टीज लि., ऑटोलाइन इंडस्ट्रीज लि., अॅपिटेक लि. ऑटोलाइन इंडस्ट्रीज लि. यासह इतर कंपन्याच्या शेरर्यमध्येही झुनझुनवाला यांची गुंतवणूक आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Rakesh jhunjhunwala portfolio having tata to titan know details investment list spb

Next Story
‘पीपल्स अँटी फॅसिस्ट फ्रंट’ या दहशतवादी संघटनेने घेतली राजौरी हल्ल्याची जबाबदारी
फोटो गॅलरी