राहुल गांधी यांनी पाच वर्षांपूर्वीच पक्षाची सूत्रे हाती घेतली असती तर आज काँग्रेस पक्ष आणि युपीए सरकारची परिस्थिती वेगळी असती, असे मत केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा यांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे आताच्या घडीला आपल्या गाठीशी अनुभव असल्याचा दावा राहुल गांधी यांना करता आला असता. राहुल गांधी यांनी आपल्या अनुभवाच्या जोरावर काँग्रेस आणि एकुणच युपीए सरकारला निश्चितच वेगळ्या स्थितीत आणून ठेवले असते. २००९ साली काँग्रेस सरकार पुन्हा सत्तेत आले तेव्हाच सरकार चालवण्यात राहुल यांनी पुढाकार घेतला पाहिजे होता असे माझ्यासह पक्षातील त्यांच्या अनेक सहका-यांना वाटत आहे. मात्र, आता भुतकाळात घडून गेलेल्या गोष्टींचा विचार करण्यात काही अर्थ नसून राहुल गांधींनी त्यावेळी पक्षाची सूत्रे स्विकारली नाहीत हे सत्य स्विकारलेच पाहिजे असे मिलिंद देवरा यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Upa would have been different had rahul gandhi arrived five years back milind deora
First published on: 26-02-2014 at 04:06 IST