बहुतेक पाश्चात्य देशांप्रमाणेच आता भारतातही इलेक्ट्रिक व गॅस शेगडीचा वापर सर्रासपणे केला जात आहे. एलपीजीच्या वाढत्या किंमती लक्षात घेता हे इलेक्ट्रिक व गॅस शेगडी एक सुलभ पर्याय म्हणून समोर येत आहे. दोन्ही प्रकारच्या शेगडीचे स्वतःचे काही फायदे आहेत, परंतु आरोग्य, आणि सुरक्षिततेचा हे सर्वात महत्त्वाचे घटक लक्षात घेता दोन्हीपैकी चांगला पर्याय कोणता याचा विचारही केला पाहिजे.

गॅस आणि इलेक्ट्रिक शेगडीचे फायदे आणि तोटे येथे दिले आहेत ज्यावरून तुमच्यासाठी दोन्हीपैकी चांगला पर्याय कोणता हे ठरवू शकता.

गॅस शेगडी म्हणजे काय? (What is a gas grill?)

गॅस शेगडीचे मुख्य वैशिष्ट्य ‘आच’ (flame) आहे. गॅस शेगडीचे विविध आकाराच्या आच असलेले बर्नर आणि उष्णतेच्या पातळीनुसार विविध प्रकारचे येतात. स्वंयपाक करताना उकळणे आणि तळणे यासारखी कार्ये सुलभ करण्यासाठी विविध प्रकाराचे गॅस शेगडीचे बर्नर उपलब्ध आहेत. गॅस शेगडी वापरण्यासाठी सिलिंडर किंवा गॅस लाईनची आवश्यकता असते.

हेही वाचा – रिचार्ज न केल्यास तुमचा मोबाइल क्रमांक बंद होईल का? तुमचा मोबाइल क्रमांक इतरांना केव्हा दिला जातो?

गॅस शेगडी वापरण्याचे फायदे? (What Are The Benefits Of A Gas Range?)

गॅस शेगडी हे शेफ आणि नियमित घरगुती स्वयंपाकासाठी अत्यंत लोकप्रिय पर्याय आहे.

रिस्पॉन्सिव्ह: गॅस शेगडी आच त्वरित कमी जास्त केली जाऊ शकते, याचा अर्थ अन्न खूप जलद किंवा खूप हळू शिजत आहे हे तुम्ही त्वरित ठरवू शकता.

पाककला तंत्र: गॅस शेगडी तुम्हाला जाळी काढून थेट गॅसच्या आचेवर अन्नपदार्थ भाजण्याची आणि शिजवण्याचा पर्याय देतो. उदा. गॅसवर भाकरी भाजणे, वांगे भाजणे इ.

पटकन थंड होते: एकदा तुम्ही गॅस शेगडीचा वापर बंद केल्यावर काही वेळात ती थंड होते.

जलद स्वयंपाक करता येतो: गॅसची उष्णता त्वरित वाढवता येऊ शकते त्यामुळे आपण अधिक जलद स्वयंपाक करू शकतो.

हेही वाचा – ‘पंतप्रधान सूर्य घर मोफत वीज योजना’ आणि ‘पंतप्रधान सूर्योदय योजना’ यात नेमका काय फरक आहे?

इलेक्ट्रिक शेगडी म्हणजे काय?

इलेक्ट्रिक शेगडीचा पृष्ठभाग हा सपाट गुळगुळती असतो जे सिरॅमिक आणि काचेच्या मिश्रणातून तयार केला जातात. सामान्यतः, इलेक्ट्रिक शेगडीमध्ये गरम होणाऱ्या धातूच्या कॉइल असतात जे कार्यक्षमतेने स्वयंपकाच्या भांड्यामध्ये उष्णता हस्तांतरित करतात. विविध स्वयंपाकाच्या कामांसाठी उपयोगी पडणाऱ्या इलेक्ट्रिक मॉडेलसाठी सहसा २२० किंवा २४० व्होल्ट आउटलेट वीज आवश्यक असते.

इलेक्ट्रिक शेगडीचे फायदे काय आहेत?

शेफ सारखा स्वयंपाक करण्याचा अनुभव देण्यासाठी इलेक्ट्रिक शेगडीला पंसती मिळते. परंतु हे ओळखणे आवश्यक आहे की, इलेक्ट्रिक शेगडीमध्ये व्यावसायिक आणि घरगुती दोन्ही स्वयंपाकघरांमध्ये होणारे फायदे दुर्लक्षित केले जातात. इलेक्ट्रिक शेगडी वापरून तुम्ही तुमची स्वयंपाकाची कामे करण्यासाठी विविध मार्गांनी करू शकता.

तंतोतंत गरम करणे: बहुतेक गॅस बर्नरच्या तुलनेत इलेक्ट्रिक शेगडी अन्न त्वरित गरम करते आणि शेगडी पटकन चालू आणि बंद होऊ शकते. हे तापमान सेटिंग बदलांना अधिक प्रतिसाद देते.

कोरडी उष्णता: विद्युत उष्णता खरोखरच गॅसपेक्षा कोरडी असते. भाजलेला ब्रेडपासून ते भाजलेले चिकन किंवा भाज्यांसारख्या विविध प्रकारच्या पदार्थ तयार करण्यासाठी ही विद्युत उष्णता फायदेशीर ठरते

स्टोव्हटॉप स्पेस आणि अष्टपैलुत्व: जर तुम्ही स्वयांपाक करताना ठराविक वेळामध्ये अनेक डिश बनवत असाल आणि तेही वेगवेगळ्या आकाराच्या भांड्यामध्ये तर इलेक्ट्रिक शेगडी बहुधा तुमच्यासाठी योग्य पर्याय आहे कारण इलेक्ट्रिक शेगडीची मल्टी रिंग घटक तुम्हाला भांड्याच्या रुंदीनुसार बदलू शकता.

इलेक्ट्रिक शेगडी स्वच्छता: रचना आणि डिझाइनमुळे, इलेक्ट्रिक शेगडीचा पृष्ठभाग सपाट आणि गुळगुळीत असल्याने स्वच्छ करणे सोपे आहे. दुसरीकडे, गॅस शेगडीचा वरील भाग साफ करताना लोखंडी जाळ्या काढाव्या लागतात जेणेकरून तुम्ही त्याखालील भाग स्वच्छ करू शकता.

हेही वाचा – बाळ जन्मताच का रडते? बाळाच्या रडण्याचे कारण कसे ओळखावे?

गॅस स्टोव्ह आणि इलेक्ट्रिक शेगडीचे काही फायदे आणि तोटे येथे आहेत:

  • गॅस शेगडीवर अन्न पटकन गरम करता येते इलेक्ट्रिक शेगडीमध्ये अन्न पटकन शिजवता येते त्याचबरोबर सातत्यपूर्ण तापमानही ठेवता येते.
  • गॅसच्या शेगडीमध्ये आच मंद असावी की तीव्र असावे यावर अचुक नियंत्रण ठेवता येते तर इलेक्ट्रिक शेगडीचे तामपान कमी असावे की जास्त यावर अचूक नियंत्रण ठेवता येते.
  • गॅसच्या शेगडीवर स्वयंपाक बनवण्यासाठी कोणतेही भांडे वापरता येतात. इलेक्ट्रिक शेगडीवर स्वयंपाक करण्यासाठी विविध भांड्याचा वापर केला जाऊ शकतो
  • गॅस शेगडीची सफाई करणे बर्नर आणि जाळीमुळे त्रासदायक असू शकते पण इलेक्ट्रिक शेगडीचा सपाट पृष्ठभाग असल्याने साफ करणे सोपे असते.
  • गॅस शेगडी वापरण्यासाठी सिलिंडर किंवा गॅसलाईन असणे आवश्यक आहे जी अधिक महाग असू शकते तर इलेक्ट्रिक शेगडी वापरण्यासाठी वीजचे आवश्यकता असते पण गॅस शेगडीच्या तुलनेत ते कमी खर्चिक असू शकते.
  • गॅस शेगडीची किंमत अनेकदा जास्त असते. तर इलेक्ट्रिक शेगडी सहसा सुरुवातीला अधिक परवडणारी असते.
  • गॅस शेगडी वापरतान आगीच्या ज्वाळांमुळे धोका निर्माण होतो तसेच गॅस गळती होणेही धोकादायक असू शकते तर इलेक्ट्रिक शेगडी सामन्यत: सुरक्षित मानली जाते.
  • गॅस शेगडीमध्ये जळणारा गॅस उत्सर्जनास हातभार लावतो तर वीजसाठी जीवाश्म इंधनावर अवलंबून राहावे लागू शकते.