बाळाचा जन्म ही आई- वडिलांसाठी आयुष्यातील आनंदाचा क्षण असतो पण बाळाला सांभळणे ही एक मोठी जबाबदारी आणि मोठे आव्हान असते. सर्वजण बाळाच्या आगमनामुळे उत्सूक असतात, आनंदी असतात. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हसू असते पण बाळ मात्र रडत असते. बाळ नक्की का रडत आहे हे समजत नसल्यामुळे आई-वडीलांसह सर्वांना चिंता वाटत असते. बाळाला जन्माच्या क्षणापासूनच त्याला कसे रडायचे हे माहित असते. खरं तर रडणे हा त्यांचा संवाद साधण्याचा एकमेव मार्ग आहे. नवजात बाळ त्यांच्या गरजा व्यक्त करण्यासाठी ते रडते. बाळ रडू लागले की पालकांना काही सुचत नाही. अशा वेळी आधी दीर्घ श्वास घ्या आणि तुमचे बाळ का अस्वस्थ होऊ शकते याचा अंदाज लावा. कारण बाळ रडण्यामार्फत पालकांशी संवाद साधत असते.म्हणून तुमचे बाळ तुमच्याशी काय बोलत आहे हे लक्षात घेणे उपयुक्त ठरेल. हेल्थलाईनने दिलेल्या माहितीनुसार जसजसा वेळ जातो तसतसे हे रडणे नवीन पालकांसाठी चिंतेचे कारण बनू शकते, विशेषत: जेव्हा त्यामागील कारणे समजत नाही. रडणारे बाळ नक्कीच पालकांची चिंता वाढवते आणि प्रसूतीनंतर बाळच्या आईवर खूप ताण निर्माण करू शकते. सुरुवातीच्या महिन्यांत बाळाच्या रडण्यामुळे नवीन पालक बाळाला घेऊन डॉक्टरांकडे जातात. बाळाच्या गरजा समजून घेणे आणि त्यांना योग्य प्रतिसाद देणे हे पालकांची भूमिका आहे. हा दृष्टिकोन मुलाचा भावनिक, सामाजिक आणि संवाद विकास वाढवतो. खरेतर, संशोधनातून असे दिसून आले आहे की,"बाळाच्या रडण्यावर त्यांच्या कुटुंबाच्या मूळ भाषेचा प्रभाव असतो. पण प्रश्न असा पडतो, रडण्यामधून तुमचे बाळ नेमके काय बोलू पाहत आहे? तुमचे बाळ तुमच्यासह काय संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहे हे तुम्ही पालक म्हणून जाणून घेतले पाहिजे. बाळा का रडते? नवजात बाळ विविध कारणांसाठी रडतात आणि पारंपारिकपणे, सात सामान्य कारणे वर्णन केली आहेत: पालकांच्या सहवासासाठी रडणे भूक लागल्यावर रडणे वेदना झाल्यावर रडणे झोप न लागल्यास रडणे चिडचिड होत असेल तर रडणे अस्वस्थता जाणवत असेल तर रडणे या कारणांमुळे बाळाला रडू येऊ शकते. "बाळाच्या फक्त रडण्याच्या आवाजाचे विश्लेषण करण्यापलीकडे, बाळाच्या चेहऱ्यावरील हावभाव आणि शरीराच्या हालचालींचे निरीक्षण केल्यास त्यांच्या रडण्याचे कारण समजून घेऊन त्याच्या गरजा पूर्ण करता येतील. हेही वाचा - टॅटूसाठी वापरली जाणारी शाई आणि सुई सुरक्षित आहे की नाही, हे कसे ओळखावे? तज्ज्ञांकडून जाणून घ्या… बाळाच्या रडण्याची कारणे? भूक बाळाच्या रडण्याचे सर्वात सामान्य कारण भूक आहे. सुदैवाने, याची काळजी घेणे सोपे आहे. पण बाळ भुक लागल्यामुळे रडत आहे हे कसे ओळखावे? भुकेले बाळ ओठ चोखायला सुरुवात करेल, हाताची मुठीत चोखेल आणि स्तन शोधत बाजूला डोके वळवेल. जेव्हा त्यांना भूक लागल्यानंतर आहार दिला जात नाही तेव्हा ते रडतात. काहीवेळा ते रडण्यापूर्वी या भुकेचे संकेत ओळखणे महत्त्वाचे असते. एकदा बाळाला खायला मिळाले की लगेच ते शांत होते. चिडचिड होणे जेव्हा बाळाची प्रचंड चिडचिड होते तेव्हा बाळ विचित्र पद्धतीने रडते. नवजात बाळ हा आंनद देणारा झरा असतो. बाळाला भेटण्यासाठी, त्यांना उचलून घेण्यासाठी आणि त्यांच्याशी बोलण्यासाठी कुटुंबातील प्रत्येक सदस्य उत्साही असतो. बाळालाही सर्वांचा सहवास हवासा वाटतो. पण बाळाचे झोपण्याचे, खाण्या-पिण्याचे एक दैनिक चक्र असते ते जर बिघडले तर बाळाची झोप पूर्ण होत नाही. त्यामुळे बाळाला नक्की काय करायचे समजत नाही. अशा वेळी बाळ खूप चिडचिड करतात; अशा वेळी त्यांना स्पर्श करणे किंवा त्यांच्याशी बोलणे, डोक्याला किंवा चेहऱ्याला हात लावणे आणि हात पाय हलवणे आवडत नाही, ज्यामुळे त्यांना सांत्वन करणे कठीण होते. अशा परिस्थितीत, त्यांना शांत, अंधुक प्रकाश असलेल्या ठिकाणी घेऊन जा, त्यांच्यासाठी सौम्य आवाजात गाणे किंवा अंगाई गा म्हणजे ते शांत होईल. जर बाळाला काही वेळ झोप मिळाली तरी ते शांत होईल. झोप आल्यावर रडणेबाळाला झोप आली की, ते जांभई देते आणि डोळे चोळू लागते. बाळाला अंगाई गाऊन किंवा मांडीवर थोपटून अथवा पाळण्यामध्ये ठेवून झोपवावे. वेदनादायक रडणे बाळाला जर वेदना होत असेल तर ते अत्यंत मोठ्याने रडते. तसेच रडताना बाळाचे डोळे बंद होतात, हाताची मुठ घट्ट आवळतात आणि पायाची बोटेही घट्ट आवळून ठेवतात. अशा वेळी बाळच्या वेदना समजून घेण्याचा प्रयत्न करा. आवश्यकता असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. कंटाळा आल्यावर रडणे बाळाला कंटाळा आल्यावरही बाळ रडू लागते. त्याला नवीन जागी नेताच ते शांत होऊ शकते. त्याला आनंदी आणि उत्साही गोष्टींमध्ये गुंतवून ठेवल्यास ते रडणार नाही. नवीन गोष्टीचा सामना केल्यानंतर बाळाला जाणवणारा कंटाळवाणेपणा कमी करण्यास मदत होऊ शकते आणि बाळाच्या सर्वांगीण विकासास हातभार लावू शकते. बाळाच्या प्रतिसादाचे निरीक्षण करण्यासाठी आणि त्यांच्या संज्ञानात्मक आणि संवेदनाक्षम वाढीसाठी अधिक आकर्षक वातावरण तयार करण्यासाठी पालक वयानुसार खेळणी, रंगीबेरंगी व्हिज्युअल किंवा सौम्य संगीतासह प्रयोग करू शकतात." पचन समस्या बाळाची पचनसंस्था विकसित होत असते. यादरम्यान बरेच काही बदल होत असतात. त्यामुळे पचनसंस्था सुरळीत काम करत नाही तोपर्यंत प्रत्येकवेळी अस्वस्थता जाणवू लागले की, ते रडू लागतात. बाळाला गॅस होणे यासारख्या समस्यांमुळे बाळ रडू शकते. ही चिन्हे ओळखणे आणि त्यांचा त्रास दूर करण्याचा प्रयत्न करा. जसे की, बाळाच्या पोटाला मालिश करणे किंवा गॅस सोडण्यासाठी त्यांचे पाय उचलणे मदत करते. गॅस बाहेर काढण्यासाठी बाळाला खांद्यावर ठेवा हळूवारपणे थोपटावे. अस्वच्छ डायपर बाळाचे डायपर ओले होणे, खूप गरम किंवा थंड वाटणे यामुळे बाळ अस्वस्थ होते आणि रडू लागते. बाळाचा डायपर स्वच्छ आहे का ते तपासा. बाळाने 'शी' केली असेल तर लगेच साफ करा नाहीतर त्यांच्या संवेदनशील त्वचेला त्रास देईल, विशेषत: जर त्यांना आधीच पुरळ असेल तर. प्रत्येक वेळी तुम्ही डायपर बदलता तेव्हा डायपरच्या भागावर डायपर क्रीम लावा. बाळ जन्मताच का रडतात? हेल्थलाईन दिलेल्या माहितीनुसार, बाळाच्या जन्मानंतर जेव्हा ते पहिला श्वास घेते तेव्हा ऐकू येणारा पाहिला आवाज म्हणजे बाळाचे रडणे. बाळ पोटात असते तेव्हा श्वास घेण्यासाठी आईवर अवलंबून आहे. एकदा बाळ आईच्या पोटातून पूर्णपणे बाहेर आले की, बाळाला खोकला येऊ शकतो किंवा बाळाच्या तोंडातून लाळ बाहेर येऊ शकते कारण ते त्यांच्या श्वासनलिकेत अडथळा आणणारे द्रव बाहेर टाकतात आणि त्यांच्या फुफ्फुसात हवा भरते. हवेचा वेग त्यांच्या स्वर यंत्रामधून पुढे जातो आणि बाळाचे पहिले रडणे ऐकू येते. या पहिल्या आश्चर्यकारक रडण्याचा आनंद घ्या कारण ते सूचित करते की, बाळाची श्वसन आणि रक्ताभिसरण प्रणाली यशस्वीरित्या कार्य करत आहे." नवजात बाळ रडणे सुरू ठेवू शकतात कारण त्यांना बाहेरील जगामध्ये प्रवेश केल्याचा धक्का बसला आहे. स्पर्श आणि स्तनपानामुळे त्यांना हवा असलेला आराम मिळू शकतो.