वैद्यकीय उपचार घेण्यासाठी एखादी व्यक्ती स्वत:च्या देशातून दुसऱ्या देशात जात असेल तर या प्रक्रियेला वैद्यकीय पर्यटन म्हणतात. आपल्या देशात दरवर्षी लाखो लोक वैद्यकीय पर्यटनासाठी येतात. कमी पैशांमध्ये दर्जेदार आणि चांगली वैद्यकीय सुविधा मिळत असल्यामुळे उपचार घेण्यासाठी विकसित देशांतील लोक भारतात येत आहेत. पश्चिमी देशांच्या तुलनेत भारत देशात वैद्यकीय खर्च ३० टक्क्यांनी कमी आहे. त्यामुळे वैद्यकीय पर्यटन आणि यामध्ये भारताचे नेमके स्थान काय? याबाबत जाणून घेऊया.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> विश्लेषण : ‘हर घर तिरंगा’ मोहीम आहे तरी काय? यामध्ये कसं सहभागी व्हायचं? यात सहभागी झाल्याचं प्रमाणपत्र कसं मिळतं?

भारत सरकारने दिलेल्या माहितीनुसार वैद्यकीय पर्यटनासाठी थायलंड, मेक्सिको, अमेरिका, सिंगापूर, भारत, ब्राझील, तुर्की आणि तैवान या देशांना पसंदी दिली जाते. भारतात हृदयाच्या शस्त्रक्रियेसाठी साधारण चार लाख रुपये लागतात. थायलंडमध्ये हाच खर्च १५ लाख रुपये आहे. अमेरिकेमध्ये तर हृदयावरील शस्त्रक्रिया करायची असेल तर तब्बल ८० लाख रुपये लागतात. २०१७ ते २०२०२ या कालावधित बांगला देशातून वैद्यकीय पर्यटनासाठी येणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. इराक अफगाणीस्तान तसेच मालदीव हे देश दुसऱ्या क्रमांकावर आहेत. ओमान, केनिया, म्यानमार आणि श्रीलंकेमधून येणाऱ्या पर्यटकांची संख्यादेखील लक्षणीय आहे.

हेही वाचा >>> विश्लेषण : भारताला स्वातंत्र्य देण्यासाठी ब्रिटिशांनी १५ ऑगस्टचीच निवड का केली? जाणून घ्या यामागील महत्त्वाचं कारण

वैद्यकीय पर्यटनासाठी कोणते देश आघाडीवर

२०२०-२०२१ या वर्षात ४६ देशांमध्ये कॅनडा या देशाला प्रथम क्रमांकावर वैद्यकीय पर्यटनाला पसंदी देण्यात आली. वैद्यकीय तसेच आरोग्य सेवांच्या सुविधेमध्ये असणारे तंत्रज्ञान आणि आधुनिकतेमुळे कॅनडा देशात वैद्यकीय पर्यटनाला जाणाऱ्यांची संख्या जास्त आहे. तसेच अमेरिकेसारखा विशाल देश कॅनडाच्या जवळ असल्यामुळेही येथे वैद्यकीय पर्यटनाला चालना मिळालेली आहे.

हेही वाचा >>> विश्लेषण : मराठमोळा धावपटू अविनाश साबळे केनियन वर्चस्वाला कसे देतोय आव्हान?

हे देश वैद्यकीय पर्यटनामध्ये आघाडीवर आहेत

सिंगापूर
जपान
स्पेन
युनायटेड किंग्डम
दुबई
कॉस्टा रिका
इस्त्राईल
अबू धाबी
भारत

भारतात वैद्यकीय पर्यटनासाठी खालील १० शहरांना दिले जाते प्राधान्य

चेन्नई
मुंबई
नवी दिल्ली
गोवा
बेंगळुरू
अहमदाबाद
कोयंबतूर
वेल्लोरे
अलेप्पी
हैदराबाद

हेही वाचा >>> विश्लेषण : गुन्हेगार ओळख कायदा कार्यान्वित… काय आहेत महत्त्वाच्या तरतुदी?

भारतात वैद्यकीय पर्यटन का वाढत आहे?

>>>> मागील काही वर्षांपासून भारतातील वैद्यकीय पर्यटन बरेच वाढले आहे. याची काही कारणं आहेत. भारतात बोनमॅरो प्रत्यारोपण, बायपास सर्जरी, गुडघ्याची शस्क्रिया, यकृत प्रत्यारोपण आदी उपचार पश्चिमी देशांच्या तुलनेत स्वस्तात केले जातात. तसेच आपल्या देशात वैद्यकीय कर्मचारी तसेच कुशल डॉक्टर असल्यामुळेदेखील येथे वैद्यकीय पर्यटन वाढत आहे.

हेही वाचा >>> विश्लेषण : मंत्रालय पुन्हा ‘सचिवालय’?

>>>> भारतात तांत्रिकदृष्या प्रगत रुग्णालये आहेत. तसेच भारतात तज्ज्ञ डॉक्टर,मेडिकल व्हिजा, ई-मेडिकलसारख्या सुविधा उपलब्ध आहेत. ज्यामुळे भारताला आशिया खंडातील सर्वात चांगले वैद्यकीय पर्यटनस्थळ होण्यास मदत मिळत आहे.

>>>> भारतात इतर देशांच्या तुलनेत वैद्यकीय खर्च ३० टक्क्यांनी कमी लागतो. या कारणामुळेदेखील येथे वैद्यकीय पर्यटन वाढत आहे.

>>>> भारतात भाषेची अडचण जाणवत नाही. येथे इंग्रजी बोलणारे डॉक्टर्स, प्रशिक्षित वैद्यकीय कर्मचारी तसेच मार्गदर्शकांची संख्या बरीच आहे. परिणामी परदेशी नागरिकांना संवाद साधणे सोपे जाते. या कारणामुळेदेखील विदेशी लोक भारतात वैद्यकीय उपचार घेणे पसंद करतात.

हेही वाचा >>> विश्लेषण : शक्तीशाली चीनच्या हल्ल्यांना सडेतोड प्रत्युत्तर देण्याची तैवानची खास रणनीति काय? वाचा…

>>>> भारतात वंध्यत्वावर यशस्वी उपचार करणाऱ्या तज्ज्ञ डॉक्टरांची संख्या बरीच आहे. तसेच वंध्यत्वावर उपचार करण्यासाठी येथे कमी खर्च लागतो. भारतात इम व्हिट्रो फर्टिलायझेशन (आयव्हीएफ) असिस्टेड रिप्रोडक्टिव्ह टेकनॉलोजी (एआरटी) तसेच अन्य आरोग्य सुविधा कमी खर्चात मिळतात.

१५६ नागरिकांना मिळाला ई-मेडिकल व्हिजा

वैद्यकीय क्षेत्रात भारत देशाची प्रगती व्हावी यासाठी भारत सरकारकडून परदेशी नागरिकांना वेगवेगळ्या सोईसुविधा दिल्या जातात. यामध्ये भारत सरकारकडून परदेशी नागरिकांना मेडिकल व्हिजा देण्यात येतो. याच सुविधेमुळे देशातील वैद्यकीय पर्यटनास चालना मिळत आहे. मेडिकल टूरिझमच्या अंतर्गत आतापर्यंत १५६ देशांतील नागरिकांना ई-मेडिकल व्हिजा देण्यात आला आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Explained know what is medical tourism and what indian government done for it prd
First published on: 08-08-2022 at 16:58 IST