कोल्हापूर : येथील प्रिन्सेस पद्माराजे हायस्कूलमध्ये रविवारी एका स्पर्धा परीक्षेच्या नियोजनावरून पालकांनी गोंधळ घातला. संयोजक आणि पालकांमध्ये शाब्दिक वाद वाढल्याने तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी परिस्थिती आटोक्यात आणली असली तरी अशा पद्धतीच्या परीक्षांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. जिल्ह्यात असा प्रकार अन्यत्रदेखील घडल्याचे पालकांचे म्हणणे आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

येथील ‘द न्यू एज्युकेशन सोसायटी’च्या मंगळवार पेठेतील प्रिन्सेस पद्माराजे हायस्कूलमध्ये प्राथमिक शाळेतील मुलांसाठी ही स्पर्धा परीक्षा, बुद्धिमापन स्वरूपाची परीक्षा आयोजित केली होती. परीक्षेसाठी प्राथमिक शाळेतील मुले सकाळी लवकर येऊनही त्यांना वर्गात सोडण्यात आले नव्हते. पेपर हाती आल्यानंतर विद्यार्थ्यांना दुसऱ्याच वर्गाचा पेपर मिळाला असल्याचे दिसून आले. अनेक ठिकाणी विद्यार्थी संख्येच्या तुलनेने पेपरचे प्रमाण कमी होते. अशा अनेक त्रुटी होत्या. एकूणच नियोजन बिघडलेले होते.

हेही वाचा : कोल्हापूर : चंदगडमध्ये भाजपचा अजितदादा गटाला शह; शिवाजी महाराजांच्या पुतळा अनावरणातून राजकीय नाट्य रंगले

पालकांचा भडीमार

याबाबत माहिती मिळाल्यानंतर पालकांनी संयोजकांशी वाद घातला. अशा प्रकारे परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनाशी कशासाठी खेळले जात आहे, असा प्रश्नांचा भडीमार पालकांनी सुरु केला. यातून पद्माराजे हायस्कूलमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनास्थळी पोलीस आल्यानंतर त्यांनी हा वाद मिटवला. जिल्ह्यात मोठ्या संख्येने विद्यार्थी या परीक्षेला बसले होते.

हेही वाचा : सरकार बरखास्त करण्याची विरोधकांची मागणी अर्थहीन – अजित पवार

विस्कळीत ‘ध्येय’

‘ध्येय अकॅडमी’ नावाच्या संस्थेने या परीक्षेचे आयोजन केले होते. परीक्षेदरम्यान गोंधळ झाला आहे. तो नेमका कशामुळे झाला याची माहिती घेत आहोत, असे संस्थेचे सचिव प्रभाकर हेरवाडे यांनी सांगितले.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In kolhapur padmaraje high school dispute between parents and coordinator on school students competitive exam css
First published on: 11-02-2024 at 18:05 IST