Keshavrao Bhosale Theater Kolhapur Massive Fire संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाला लागलेली आग धुमसत आहे. ती विजवण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू झाले आहेत. घटनास्थळी काँग्रेसचे विधान परिषदेचे गटनेते सतेज पाटील, महापालिकेच्या आयुक्त के. मंजू लक्ष्मी, वरिष्ठ अधिकारी, पोलीस अधिकारी पोहोचले आहेत. शॉर्टसर्किट होऊन आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. कोल्हापुरातील केशवराव भोसले नाट्यगृहाचे अलीकडे नूतनीकरण झाले होते. नाट्यगृहामध्ये लाकडी बांधकाम मोठे आहे . हेही वाचा : Keshavrao Bhosale Theater Fire: कोल्हापुरातील केशवराव भोसले नाट्यगृहाला भीषण आग आग लागल्यानंतर या साहित्याने लगेचच पेट घेतला. त्यामुळे आग पसरत गेली. त्यावर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न कोल्हापूर महापालिका , विमानतळ अग्निशमन दल यांच्याकडून सुरू आहे. गेल्या तासांहून अधिक काळ आग आटोक्यात आणण्यासाठी मोठी यंत्रणा कार्यरत झाली आहे. ती काही प्रमाणामध्ये आटोक्यात आली असली तरी ती पूर्ण थंडावलेली नाही. आगीमध्ये नाट्यगृहाचे बहुतेक साहित्य जळून भस्मसात झाले आहे. कोल्हापूरचा सांस्कृतिक ठेवा उघड्या डोळ्यात देखत बेचिराख झाल्याचे दुःख नाट्यप्रेमींना आहे.